त-हाडी येथे , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
तऱ्हाडी:- शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेल्या पुर्णाकृती पुतळ्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिना निमित्ताने बौद्धाचार्य गौतम अहिरे यांनी जमलेल्या जनसमुदायासोबत सामुहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले तसेच उपसरपंच उजनबाई अहिरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अँड.रविंद्र अहिरे यांच्या हस्ते केक कापून . अभिवादन करण्यात आले
उपस्थित समाज बांधवांनी व गावातील मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले व यांच्या जीवन चरीत्र तसेच त्यांनी केलेल्या कार्यावर उजाळा दिला जयंती .
यावेळी. तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे, युवा मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर, माजी सरपंच सुदाम भलकार माजी उपसरपंच, ओंकार पाटील,माजी सरपंच कैलास भामरे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील . नरेंद्र भाईदास सोनवणे.सागर सोनवणे. रावसाहेब अहिरे, प्रविण अहिरे, सिध्दार्थ अहिरे, ,गावातील आजी माजी पदाधिकारी तसेच त-हाडी येथील ग्रामस्थ व भीम सैनिक आपल्या महामानवास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन किरण अहिरे व गौतम अहिरे यांनी केले.







