महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांच्या आदर्शचा सन्मान करावा – इंजि.अनिता पाटील
आटपाडी प्रतिनिधी
महापुरुषांची जयंती साजरी करत असताना डीजे लावून डान्स करणे अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. म्हणून महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या आदर्शाला साजेस असे वर्तन असावं अशा पद्धतीचं इंजि.अनिता पाटील यांनी समाज माध्यमावरती मत प्रदर्शित केले होते
मात्र यानंतर अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपली वेगवेगळी मते मांडण्यास सुरुवात केली. याबाबत अनिता पाटील यांनी त्यांनी समाज सोशल माध्यमावर जे मत मांडलं त्याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे .
अनिता पाटील सोशल मीडियावर म्हणाल्या जयंती उत्सव साजरे करणारे कधीही बाबासाहेबांचे अनुयायी नसतील ,आमचा बाप म्हणणारे वरातीत नाचल्यासारखे बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीत नाचत आहेत . बाबासाहेबांची जयंती म्हणजे सर्वांसाठी नक्कीच एक मोठा उसत्व आहे परंतु त्यांचा विचारांचा अपमान करणारी जयंती कधीच नसावी.
असे मत सोशल मीडिया वर अनिता पाटील यांनी व्यक्त केल्या नंतर अनेक विभागातून अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत स्पष्ट केले.







