वीर पत्नी शांताबाई गायकवाड यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन
शेटफळे येथील दुसऱ्या महायुद्धातील सैनिक पेड लान्स नाईक कैलासवासी आत्माराम आनंदा गायकवाड यांच्या पत्नी शांताबाई आत्माराम गायकवाड यांचं दिनांक 13 मे 2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजता निधन झाले.
लान्स नाईक आत्माराम गायकवाड हे दहा पाच मराठा रेजिमेंट मध्ये होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये बर्मा मध्ये मोठी कामगिरी केली होती
शांताबाई गायकवाड ह्या नॅशनल मीडिया न्यूज एजन्सी चे मॅनेजिंग डायरेक्टर अशोक पवार यांच्या आजी आहेत दिनांक 6 एप्रिल रोजी घरी मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन आजारी पडल्या होत्या. त्यानंतर वारंवार मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने परिस्थिती नाजूक बनली होती .
गेल्या 37 दिवसापासून त्यांची मृत्यूची झुंज चालू होती आज सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात सुना नातवंडे असा परिवार आहे.
वीर पत्नी शांताबाई गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली