स्फूर्ती योजनेची मराठवाडा पातळीवरील कार्यशाळा नेकनूर ला संपन्न
पाटोदा ; नेकनूर
भारत सरकारच्या लघु सूक्ष्म व उद्योग मंत्रालयाच्या MSME स्फूर्ती योजनेची माहिती, मराठवाड्यातील संस्थांना देण्यासाठी, प्रमोद झिंजाडे, महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा, संजय शिंदे, हिंद संस्था, नेकनूर व विश्वनाथ तोडकर, पर्याय संस्था, कळंब यांनी, संयुक्तपणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. शुक्रवार दिनांक 30 जुलै 2021 रोजी, पर्याय संस्थेच्या हासेगाव येथील प्रशिक्षण केंद्रावर ही तिसरी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत स्वयंसेवी संस्थांचे 35 हुन अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्फूर्ती कार्यक्रमाची महाराष्ट्रातील तांत्रिक सहाय्यकारी संस्था, एस जी फाउंडेशन, नाशिकचे प्रमुख नितीन सोनवणे यांनी स्फूर्ती योजनेची सविस्तर माहिती, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दिली. शेवटी प्रश्नोत्तरे व संस्थांचा परिचय झाला.
ज्या संस्था या योजनेच्या अटी पूर्ण करू शकतील त्यांना प्रकल्प बनवणे, पाठपुरावा व मंजुरी नंतरच्या सेवा यासाठी एस जी फाऊंडेशन सहकार्य करणार आहे. कार्यशाळेच्या स्थानिक आयोजनाची जबाबदारी हिंद संस्था, नेकनुरचे संजय शिंदे यांनी पार पाडली तसेच कार्यशाळेसाठी आलेल्या प्रतिनिधींची रहाणे, जेवण, निवास तसेच प्रशिक्षण हॉल व्यवस्था पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर यांनी विनाशुल्क केली होती. या कार्यशाळेत अफार्मचे माजी कार्यकारी संचालक कोंढाळकर सर, पर्यायचे विश्वनाथ अण्णा तोडकर, ग्रामीण विकास मंडळाचे सय्यद सर, युवा ग्राम विकास मंडळाचे एच पी देशमुख, नाशिकचे राजू सिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद झिंजाडे यांनी ही कार्यशाळा आयोजित करून, संस्थांना स्फूर्ती योजनेची माहिती दिली याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले. चौथी कार्यशाळा, दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी, डॉ मधुकर गुंबळे, अपेक्षा होमिओ सोसायटी, अमरावती येथे होणार आहे. जास्तीत जास्त संस्थांनी स्फूर्ती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी इच्छा प्रमोद झिंजाडे यांनी व्यक्त केली.







