• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

“सांगली जिल्हा अंतर्गत मिरज तासगाव व पलुस येथेही सत्संग कार्यक्रम संपन्न”

माणगंगा by माणगंगा
May 16, 2023
in सांगली
0
“सांगली जिल्हा अंतर्गत मिरज तासगाव व पलुस येथेही सत्संग कार्यक्रम संपन्न”

“सांगली जिल्हा अंतर्गत मिरज तासगाव व पलुस येथेही सत्संग कार्यक्रम संपन्न”

       मे, 2023ः "सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू. आपण त्यांची शिकवण केवळ बोलण्या पुरती सीमित ठेवायची नसून आपल्या वास्तविक जीवनात उतरवायची आहे.  शिकवणुकीच्या रूपात जे दिव्य मोती बाबजींनी दिले आहेत ते आपल्या जीवनात धारण करायचे आहेत.  प्रेम, समर्पण आणि गुरूच्या प्रति जो आदर आहे तो अंतःकरणपूर्वक असावा, केवळ दिखावा नसावा . आपण स्वतःचे आत्मचिंतन करायचे आहे. प्रत्यक्षाल प्रमाणाची गरज नसते अशा प्रकारे आपला गुरुप्रति  समर्पणाचा सच्चा भाव असावा. केवळ एका विशिष्ट दिवशी आपण त्यांचे स्मरण करायचे नसून त्यांनी दिलेल्या शिकवणुकीतून सदैव प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थक करावे." असे भावपूर्ण उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा (हरियाणा) येथे आयोजित समर्पण दिवसाच्या मुख्य सोहळ्याला दिल्ली व आसपासच्या राज्यांमधून उपस्थित विशाल जन समुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. या कार्यक्रमात सद्गुरु माताजींच्या समवेत निरंकारी राजपिताही उपस्थित होते.

 समर्पण दिवसा निमित्त सांगली जिल्ह्यातील सांगली खानापुर व वाळवा सेक्टर अंतर्गत मिरज तासगाव पलुस येथेही विशाल सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सांगली जिल्हा व परिसरातील भाविक भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रति आपली श्रद्धा सुमने अर्पण केली. 
     सद्गुरु माताजींनी एक उदाहरण देऊन समजावले, की दूध घुसळून त्यातून मलई किंवा नवनीत बाहेर पडू शकेल पण पाण्यात रवी घुसळून काहीही मिळणार नाही. तात्पर्य, ईश्र्वराशी नाते जोडल्यानेच खरी भक्ती होऊ शकेल आणि आपले मन आदर प्रेमाच्या भावनेने ओतप्रोत होईल व गुरूच्या प्रति खरीखुरी प्रेमाभक्ती हृदयात उत्पन्न होईल. म्हणूनच सद्गुरूंचा सत्य संदेश केवळ बोलण्या पर्यंत सीमित राहू नये.

सद्गुरु माताजी यांच्या प्रवचना पूर्वी निरंकारी राजपिताजी यांनी आपल्या सम्बोधनात सांगितले, की बाबाजींचे अवघे आयुष्य उपकार, वरदान आणि कृपादृष्टीने परिपूर्ण होते. बाबाजींनी अवघ्या जगाला संसार प्रेम व शांतीचा दिव्य संदेश दिला. प्रेमाचा वास्तविक अर्थ आम्हाला बाबाजींच्या शिकवणुकीतूनच उमगला. त्यांनी सदैव प्रेम आणि आपल्या मधुर हास्याने सर्वांना आनंदित केले इतकेच नव्हे तर समस्त मानवमात्राच्या प्रति दया व करुणेचा भाव बाळगत सर्वांचे जीवन सार्थक केले. बाबाजींचा हाच दृष्टिकोन होता, की जीवनात जर प्रेमभाव असेल तर झुकणे सहज होईल. त्यांच्या मते आपण उंची अशा प्रकारे गाठावी, की तिचा मायावी दुष्प्रभाव भक्ताच्या जीवनावर होऊ नये. बाबाजींनी योग्यता अयोग्यता यांचा विचार न करता सर्वांभूती केवळ समानता आणि करुणेचा भावच दर्शविला. शेवटी राजपिताजी यांनी हीच प्रार्थना केली, की सर्वांचे जीवन सद्गुरूंच्या आशयानुसार व्यतीत व्हावे.

समर्पण दिवसाच्या मुख्य कार्यक्रमासह स्थानिक कार्यक्रमातही मिशनच्या अनेक वक्त्यांनी व्याख्यान, गीत, भजन व कविता आदि माध्यमातून बाबाजींच्या प्रेम, करूणा, दया व समर्पण यांसारख्या दिव्य गुणांचे वर्णन आपल्या शुभ भावनानांद्वारे केले. बाबा हरदेवसिंहजी यांची करूणामय अनुपम छबी प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयात कोरली गेली असून त्यातून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक भक्त आपले जीवन कृतार्थ करत आहे.

 

मीडिया सहायक, …..

Views: 21
Share

Related Posts

आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस.विजेच्या धक्क्याने रेडकाचा मृत्यू…झरे खरसुंडी करगणीत जोरदार, आटपाडी दिघंची तुरळक
सांगली

आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस.विजेच्या धक्क्याने रेडकाचा मृत्यू…झरे खरसुंडी करगणीत जोरदार, आटपाडी दिघंची तुरळक

June 5, 2023
राष्ट्रवादीचे ए.बी फॉर्म खिशात ठेवून पक्षांतर करणाऱ्याला जयंत पाटलांच्यावर बोलण्याचा आधिकार नाही. प्रा.एन. पी. खरजे
सांगली

राष्ट्रवादीचे ए.बी फॉर्म खिशात ठेवून पक्षांतर करणाऱ्याला जयंत पाटलांच्यावर बोलण्याचा आधिकार नाही. प्रा.एन. पी. खरजे

June 3, 2023
“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!
सांगली

“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!

May 31, 2023
बोगस हजेरी लावून रोजगार हमीचे काम पूर्ण….माजी सरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजगार हमीच्यां कामावर…आदर्श गाव समजणाऱ्या गावातच रोजगार हमी कामात घोटाळा
सांगली

बोगस हजेरी लावून रोजगार हमीचे काम पूर्ण….माजी सरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजगार हमीच्यां कामावर…आदर्श गाव समजणाऱ्या गावातच रोजगार हमी कामात घोटाळा

May 29, 2023
संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सांगली

संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

May 27, 2023
अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न
सांगली

अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न

May 20, 2023
Next Post
शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत आणि सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थित रहा— शेख निजाम

शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत आणि सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थित रहा--- शेख निजाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)