• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सायबरचा नवीन “पिंक” विळखा लोकांनो धोका यातला ओळखा – अॅड.चैतन्य एम. भंडारी

माणगंगा by माणगंगा
June 22, 2023
in मुंबई
0
सायबरचा नवीन “पिंक” विळखा लोकांनो धोका यातला ओळखा – अॅड.चैतन्य एम. भंडारी

सायबरचा नवीन “पिंक” विळखा लोकांनो धोका यातला ओळखा – अॅड.चैतन्य एम. भंडारी

सायबर अवेयरनेस फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या तर्फे आवाहन

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आजकाल अनेकांना व्हाट्स अप वर मेसेज येत आहेत की, व्हाट्स अप चे नवीन व्हर्जन आले असून तुमचे व्हर्जन अपडेट करा त्यानंतर तुमच्या व्हाट्स अपचा रंग गुलाबी (आकर्षक) असा होईल तसेच इतरही अनेक फीचर्स त्यात आहेत त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल.

आणि असे सांगत पुढं जाऊन ते लोक असेही भासवतात की हि व्हाट्स अप ची ऑफिशियल वेब वरून पाठवलेली लिंक व मेसेज आहे त्यामुळे काळजी करू नये ! फक्त सोबतच्या लिंक ला क्लिक करून पुढील प्रोसिजर पूर्ण करा” आणि तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुमचा व्हाट्स अप पिंक होताहोता बॅकग्राउंडला मात्र तुमचा मोबाईल हॅक होतो आणि तुमचा डेटा चोरीला जातो. आता डेटा चोरीला जाणे म्हणजे काय ? हे टेक्नोसॅव्ही लोकांना कळेल पण सामान्य लोकांसाठी सांगतोय की, डेटा म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये जे जे काही साठवले असेल ते ते सगळे चोरीला जाते. गॅलरीमधील फोटो, कुणाबरोबर केलेले चॅटिंग, बँकिंग डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर लिस्ट असं सगळं सगळं चोरीला गेल्यावर काय धोका होऊ शकतो हे लक्षात आलंच असेल. तुमचे फोटो वापरून (मॉर्फिंग करून) नंतर तुम्हालाच ब्लॅकमेल केलं जाऊ शकत. तुमच्या चॅटिंग मधील काही चॅट अर्धवट असे कट घेऊन तुम्हालाच नंतर घाबरवलं जातं. कारण भावनेच्या भरात कधीकधी आपण बरेच काही मित्राजवळ मैत्रिणीजवळ बोलून गेलेलो असतो ते सगळं अशा हॅकरसाठी जणू पुरणपोळी असते. त्याद्वारे ते तुम्हाला लुटू शकतात. आणि अजून एक म्हणजे, हल्ली टेलिमाकेर्टिंग साठी कंपन्यांना अधिकाधिक कोणताच नंबर्स हवे असतात. त्यांना तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्टस विकले जातात हॅकर कडून !

असं हे सगळं धोकादायक आहे.आजकाल लोकांना सतत नवीन काहीतरी हवं असत. सतत डीपी बदलणे, स्क्रीन सेव्हर बदलणे, इतकंच काय पण मोबाईलचे कव्हर सुद्धा बदलणे हे अनेकजण करतात.हीच मानसिकता ओळखून हॅकर्स लोकांनी आता हा नवीन सापळा रचला आहे. नाविन्याची हौस असावी पण ती इतकीही नसावी की आपणच गोत्यात यावे.

तर मंडळी,व्हाट्स अप तर्फे अधिकृत असं काहीही पिंक व्हर्जन आलेलं नाहीय. त्यामुळे असं कुणी मेसेज करून कळवत असेल तर त्याला एन्टरटेन करू नका. थेट ब्लॉक करा आणि त्या नंबरची तक्रार त्वरित १९३० या नम्बरवर करा. तसेच समजा तुमच्याच एखाद्या मित्राकडून असा मेसेज आला असेल तर त्यालाही सावध करा. कारण असा मेसेज मित्राकडून जर आला असेल तर मग त्याचा फोन ऑल रेडी हॅक झालेला असतो. त्यामुळे त्यालाही सावध करा.सावध राहा सतर्क राहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

Views: 137
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
झरेत वारकऱ्यांना पाण्याच्या बिसलरीचे वाटप… पांडुरंग आवळे यांचा उपक्रम

झरेत वारकऱ्यांना पाण्याच्या बिसलरीचे वाटप… पांडुरंग आवळे यांचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)