गाव कामगार तलाठी,मंडळ अधिकारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे …. तहसिलदार बी.एस. माने
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील मंडळ अधिकारी व गाव कामगार तलाठी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे. अन्यथा घर भाडे पगारातून वसूल केले जाईल. तसेच मंडळ व गाव कामगार तलाठी कार्यालयामध्ये खाजगी उमेदवार कामाला ठेवू नये. जर खाजगी उमेदवार ठेवला असेल आणि काही अनुचित प्रकार घडला तर संबंधित मंडळ अधिकारी व गावकामगार तलाठी यांना जबाबदार धरले जाईल व कारवाई केली जाईल .
अशा आशयाचा लेखी आदेश गावकामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आला आहे.
यापूर्वी गाव कामगार तलाठी यांनी मुख्यालयात राहावे यासाठी मनसेचे कृषी सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती.
तर तहसीलदार बी.एस. माने यांची तडकाफडकी झालेली बदली व त्यानंतर मॅट मध्ये जाऊन पुन्हा त्या पूर्वीच्या ठिकाणी रुजू झाल्या. या सर्व घडामोडीनंतर तहसीलदार बी.एस. माने यांनी सर्वच बाबतीत नियमाने चालवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
तहसीलदार बी.एस. माने यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.या निर्णयाने सर्व सामान्य जनतेतून स्वागत होत आहे. परंतु कर्मचारी या निर्णयाला कितपत प्रतिसाद देतात यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.







