बनगरवाडी, ता. माण येथील श्री. मेघनाथ सुखदेव शिंगाडे हे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातून राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल 27 जूनला सायंकाळी वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आला होता.
अतिशय प्रतिकूल व शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले शिंगाडे यांनी कष्टपूर्वक प्रयत्न करून हे यश संपादन केले. त्यांच्या या यशात कुटुंबाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता असे त्यांनी सांगितले.
सध्या ते पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालय, झरे. येथे ग्रंथपाल म्हणून 9 वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन, मा.श्री.चोपडे आर.एस.सर, सचिव, मा.श्री.पाटील एस.ए. सर व इतर संचालक मंडळ यांनी अभिनंदन व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







