आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्ष दिंडीचा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी टेकवाडे गावाचे सरपंच सुखदेव वाघ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीलाल भाई पटेल विकास सोसायटी माजी चेअरमन विजू आबा चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य आशाताई भील व पालक उपस्थित होते सर्वप्रथम पालखीचे पूजन करण्यात आले या वृक्षदिंडीच्या निमित्ताने गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यात झाडे लावा झाडे जगवा साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा स्वच्छता पाळा रोगराई टाळा आशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या व ग्रामस्थांना स्वच्छता साक्षरता व पर्यावरण या संदर्भात जनजागृतीचा संदेश या वृक्ष दिंडीच्या निमित्ताने देण्यात आला या वृक्षदिंडी व पालखीचा समारोप गावातील राम मंदिर येथे करण्यात आला तेथे उपस्थित सर्व ग्रामस्थांना शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी स्वच्छता, साक्षरता आणि पर्यावरण मानवी जीवनासाठी किती आवश्यक आहे यासंदर्भात विविध उदाहरणे देऊन महत्व समजावण्याचा प्रयत्न केला. या वृक्षदिंडीच्या कार्यक्रमासाठी शाळेतील उपशिक्षक संजय पटेल उपशिक्षिका जयश्री पाटील बालवाडी शिक्षिका सुनंदा सोनार शिक्षकेतर कर्मचारी भाईदास पावरा, अभिजीत ईशी यांनी परिश्रम घेतले.







