आर सी पटेल प्राथमिक शाळा क्रांतीनगर येथे आषाढी एकादशी निमित्त विठू माऊली नावाचा जल्लोषात गजर
त-हाडी
आर सी पटेल प्राथमिक शाळा क्रांतीनगर येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शाळेतील चिमुकल्या विद्यार्थांनी दिंडी काढत विठू माऊली नावाचा जल्लोषात गजर केला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती राणे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून राजश्री महाजन, कनिका सुखवानी,प्रिया पाटील ह्या उपस्थित होत्या
सुरवातीस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर प्रत्यक्ष चिमुकल्यानी साकारलेल्या विठ्ठल रुखमाई च्या वेशभूषेतील मुलांची पूजा करण्यात आली
कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून मुख्याध्यापक प्रदिप गहिवरे यांनी महाराष्ट्रातील संत परंपरा व पंढरपूर वारीचे महत्व विषद केले
अध्यक्षीय समारोपात ज्योती राणे यांनी अध्यात्मिक वारी बरोबरच शैक्षणिक वारी बद्दल विद्यार्थ्यांशी हितगुज केले
तदनंतर दिंडी चे विधिवत पूजन करून ग्यानबा तुकाराम च्या जयघोषात क्रांतीनगर परिसरातून दिंडी काढण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भूषण पाटील यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रदिप गहिवरे ,मीनल माळी,साळुंके स्मिता ,शुक्ल भावना ,कविता पाटील,देशमुख मंदाकिनी,जाधव सुधाकर, देवरे कामिनी ,जयश्री मराठे ,मनोज भोई,पावरा रवींद्र, गोपाल दीपक यांनी परिश्रम घेतले







