शिरपूर शहरात यंदा अधिक मासामुळे बाप्पा येणार उशिरा
प्रत्येक धार्मिक उत्सव येणार उशिरा; डॉ प्रा. दिलवरसिंग गिरासे यांची माहिती
त-हाडी प्रतिनिधी
शिरपूर शहरात यंदा अधिक मासाला तब्बल १९ वर्षांनी असा योग जुळून आला आहे. पंचांगानुसार यावेळी अधिक मास १८ जुलैपासून सुरू होत असुन १६ ऑगस्ट रोजी समाप्त होईल. यापूर्वी असा योगायोग २००४ मध्ये आला होता. दरम्यान अधिक मासामुळे गणपती बाप्पांचे आगमणही लांबणीवर पडणार असुन गणेशभक्तांना १९ दिवस अधिकची प्रतिक्षा करावी लागणार आहे.अशी माहिती डॉ प्रा. दिलवरसिंग गिरासे सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली.
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष महत्व असुन दर तीन वर्षांत एकदा अधिक मास येतो. अधिक मासालाही वेगळेच धार्मिक महत्व आहे. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते. भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी या महिन्याला अधिक महत्व पडले आहेत. असल्याचे तंत्र लोकांनी सांगितले आहे.या अधिक मासामुळे गणरायाचे आगमण तब्बल १९ दिवस उशीराने होणार आहे. गतवर्षी ३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन झाले होते तर ९ सप्टेंबर रोजी गणरायाला निरोप देण्यात आला होता. यावर्षी सप्टेंबर रोजी १९ गणेशोत्सवाला सुरवात होईल तर २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असणार आहे. अधिक मासामुळे इतरही सर्वच सण लांबणीवर रक्षाबंधन यावर्षी ३१ ऑगस्टला असेल. शिवाय पितृपक्ष, नवरात्री, दसरा आणि दिवाळीही १५ ते २० दिवस उशिरा असणार आहे.
▪️गणपती बाप्पा उशिरा ग्रामीण भागातही ढोल पथकाची क्रेझ
यंदा ८ श्रावण सोमवार
चंद्र वर्ष ३५५ दिवसांचे असते आणि सौर वर्ष 365 दिवसांचे असते. त्यामुळे एका वर्षांतील चंद्र आणि सौर वर्षांत १० दिवसांचा फरक असतो. ३ वर्षांचा हा फरक १० ते ११ दिवसांपर्यंत वाढतो. यावेळी सर्वाधिक दिवसांचा महिना श्रावण असल्याने श्रावणातील दोन महिन्यांतील एक महिना हा अधिक मासाचा आहे. त्यामुळे या वेळी श्रावण सोमवार ४ ऐवजी ८ असणार आहे.
▪️ढोल पथकांची जय्यत तयारी
त-हाडी परिसरात गणेशोत्सव पुढे गेल्याने यावर्षी मुर्तिकारांचे कामही संथगतीने सुरु आहे. दुसरीकडे ढोल पथकांनीही जय्यत तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसात शहरी भागांप्रमाणेच ग्रामिण भागातही ढोल पथकांची क्रेझ वाढली आहे. ग्रामिण भागातील युवक पुढे येऊन ढोल पथक स्थापन करित असून त्यासाठी सराव करण्यावर भर देत आहेत. यावर्षी गणेशोत्सव लांबणीवर पडल्याने सध्या केवळ साहित्याची जुळवाजुळव करण्याचे काम जय भवानी गणेश मंडळ करीत सुरू आहे.
डॉ प्रा. दिलवरसिंग गिरासे सामाजिक कार्यकर्ते त-हाडी ता शिरपूर