पिलीव येथील अहील्यादेवी चौकातील रस्तयासाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाचा इशारा म्हणजे केवळ स्टंटबाजी विरोधी नागरी आघाडीचा आरोप.
पिलीव प्रतिनिधी –
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अहील्यादेवी चौकातील रस्ताचे काम गेल्या चार वर्षापासुन रखडलेले आहे. यासाठी पिलीव शहर भाजपच्या वतीने रस्तयासाठी १ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर विरोधी नागरी आघाडीच्या वतीने ही केवळ राजकीय स्टंटबाजी असुन गल्ली ते दिल्ली यांची सत्ता असताना यांनी गेल्या चार वर्षात काहीच केलेले नाही
असा आरोपही नागरी आघाडीच्या वतीने करणयात आला आहे. नागरी आघाडीने अहील्यादेवी चौकातील रखडलेले रस्ताचे काम पुर्ण करावे म्हणून एम एस आर डी सी पुणे,रोडवेज कंपनी, तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक माळशिरस यांना २०/६/२०२२ रोजी लेखी निवेदन देउन आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांनतर सदरच्या कंपनीने पुलाचे काम व इतर काम पुर्ण केले आता फक्त रस्ता व गटारीचे काम अपुर्ण आहे. त्यासाठी आम्ही सदरच्या नवीन काम दिलेल्या कंपनीने फक्त दहाच दिवसात सदरचे काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. आणी हे काम होणार आहे हे लक्षात येताच सत्ताधारी पार्टीने याचे श्रेय नागरी आघाडीला जाईल या भितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेली तिन चार वर्षे याठिकाणी इस्टीमेट मध्ये पुल नसताना पुल व्हावा अशी मागणी करीत यांनीच काम रखडविले आहे आणी आता निवडणूक जवळ आली आहे
म्हणून आंदोलनाची स्टंट बाजी करीत आहेत गटारीचे पाणी चौकातील आडात सोडले आहे त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे, धुळीचे साम्राज्य पसरले आहे यावेळी नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला सत्तेत असताना काही च केले नाही. असा आरोप नागरी आघाडीच्या वतीने करणयात आला.
तसेच गावातील पाणीपुरवठा जलजिवन योजनेत फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे पाच वर्षाची नवीन पाईपलाईन बदलली आहे तर चाळीस वर्षाची जुनी पाईपलाईन तसेच ठेवली आहे अजुनही अनेक वाडयावस्तयावर पिणयाचे पाणी पोहचलेच नाही तर पाणी नसताना जुन्या विहीरी खोदल्या आहेत कुठल्याही विहीरीला पाणी वाढलेले नाही तर गटारीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत ,गाळयाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे तर पाच वर्षात मुख्य पेठेतील रस्ता खराब होऊनही त्यावरचा एक खड्डा सुद्धा बुजविला नाही असा आरोप नागरी आघाडीच्या वतीने करणयात आला. यावेळी नागरी आघाडीचे अध्यक्ष आरिफखान पठाण, माजी सरपंच अमोल मदने, संग्राम पाटील, नानासाहेब देशमुख, राजेंद्रसिंग जामदार, जिवन गुरव,कल्याण जावळे,संतोष बगाडे,शिवराज पुकळे,विजय पिसे,कुमार लोखंडे,वैभव पिसे,मोहन करांडे,अजय खुर्द, कुमार भैस,अक्षय वगरे,संजय रोकडे, दामोदर लोखंडे, सुजित सातपुते, संजय पाटील, गणेश देशमुख विश्वजीत गोरड आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
चौकट- लोकांची गैरसोय पाहुन गेली एक वर्ष मी पत्र-व्यवहार करतोय परंतु कधीही श्रेय घेतले नाही आणि घेणार ही नाही लोकहितासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार – जनसेवक राजाभाऊ जामदार ग्रामपंचायत सदस्य पिलीव