शेतकर्यांची पीक कर्जसाठी होणारी अडवणूक थांबवा-
शेकाप
बीड
केज येथील भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र बँक या दोन्ही बँकेच्या पीक कर्ज संदर्भात शेतकरी आमच्याकडे तक्रारी करत आहेत या बँकेमध्ये शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी अडवणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त आहेत
केज शहरातील बँकेत दरवाजे लावून घेतले जातात आत मधी बँकेचा दैनंदिन कारभार चालू असतो नव जुनं करणे कर्जमाफी पिककर्जासाठी लागणारे कागद काय कोणा सोबत चर्चा करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो कोणी ही कर्मचारी शेतकऱ्यांची संवाद साधत नाहीत शेतकरी रोज चकरा मारून परेशान झाले आहेत, आपण केज तालुक्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची कर्ज वाटपा संदर्भात तात्काळ बैठक घ्यावी संबंधित बैठकीत शेतकरी प्रतिनिधी शेतकरी आणि बँक अधिकारी असावेत, वरील तिन्ही बँकेच्या अधिकार्यांना तात्काळ आपण समज द्यावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कुलूप टाकण्यात येईल बॅंकेच कामकाज बंद करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी निवेदनात दिला आहे यावेळी अॅड निखील बचुटे आमीर इनामदार मोईन पठाण होतो
चौकट –
शेतकऱ्यांना पिक कर्जा संदर्भात काही आडचनी असतील त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात संपर्क करावा किंवा मला 9423979492 या नंबर वर संपर्क साधावा असे अवहान भाई गुंड यांनी केले आहे.







