अखेर विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल
आटपाडी प्रतिनिधी
बाळेवाडी ता.येथील कोळेकरवस्ती येथे इयत्ता दुसरीतील कु.सायली पंढरीनाथ कोळेकर हिला शिक्षक बाबासाहेब शेख यांनी मारहाण केली होती. याबाबत सोशल मीडिया प्रिंट मीडिया मध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
या घटनेबाबत पत्रकार अशोक पवार यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असल्याने शिक्षक बाबासाहेब शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास पो.हे. कॉ. पाटील तपास करीत आहेत.







