सोनारसिद्ध नाथ मंदिर येथे सोन्या चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरी..
सात लाखाच्या आसपास मुद्देमाल गायब
आटपाडी प्रतिनिधी
पुजारवाडी ता.आटपाडी येथील सोनार सिद्धनाथ मंदिर मध्ये सोन्याचांदीच्या दागिन्याची चोरी झाली आहे यामध्ये सरासरी सात लाख रुपयाचा सोन्या-चांदीचा दागिणीवर चोरट्यांनी गल्ला मारला आहे.
सोनारसिध्द नाथ मंदिर पुजारवाडी येथील ट्रस्टचे देवाचे मंदिराचे लॉक न लावता ओढुन घेतलेल्या दरवाजावाटे कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करुन एकुण १५.८३० किलो किंमतीचे देवाचे चांदिचे दागिने व १२२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण ०७,०९,२५० रु किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद झाली आहे.
येथील पुजारी नामदेव आप्पा पुजारी, पय-७२ वर्षे , रा. देशमुखवाडी यांनी तक्रार दिली आहे.यामध्ये..१,५०,०००/- रु. कि.चा. चांदिचा देवाचा मोठा घोडा, १,५०,०००/- रु. कि.चा. चांदिचा देवाचा फेटा, वजन अंदाजे ०६ किलो.,१५,०००/- रु. कि.चा. चांदिचा देवाचा लहान घोडा, वजन अंदाजे ६०० ग्रॅम, १२,५००/- रु. कि.चा. चांदिचा गणपती, त्याचे वजन ५०० ग्रॅम अंदाजे ५०,०००/- रु. कि.ची. एक चांदिचे नाण्यांची माळ, वजन०२ किलो, अंदाजे, बाकि..१२,५०० /- रु. कि.ची. एक चांदिचे नाण्यांची माळ, वजन ५०० ग्रॅम, ५,०००/- रु. कि.चे. चांदिचे दोन करदुडे, त्यांचे वजन २०० ग्रॅम अंदाजे, ७५०/- रु. कि. चे. चांदिची घागरी माळ, तिचे वजन ३०ग्रॅम अंदाजे, २२,५००/- रु. कि.ची एक सोन्याची बोरमाळ, तिचे वजन अंदाजे ७.५ ग्रॅम,६७,५००/- रु. कि. चे तिन सोन्याचे गंठण, त्यांचे एकूण वजन २२.५ ग्रॅम, ६०,००० /- रु. कि.चे तिन सोन्याचे मोठे डोलें, त्यांचे एकुण वजन २० ग्रॅम, . ६,०००/- रु. एक लहान सोन्याचे होलें, त्याचे वजन ०२ ग्रॅम ,९०,०००/- एक सोन्याचा लक्ष्मीहार, त्याचे वजन ३० ग्रॅम, ३०,०००/- . एक लहान सोन्याचे डोले, त्याचे वजन १० ग्रॅम अंदाजे, ३०,०००/- रु. कि.चे एक सोन्याचे कानातील फुलांचा जोड, त्याचे वजन १० ग्रॅम, ७,५००/- रु. कि.चा एक सोन्याचा बदाम, त्याचे वजन २.५ ग्रॅम, असा एकूण- ०७,०९,२५०/- रु. कि.चे वरील वर्णनाचे सोन्या चांदिचे चोरीस गेले आहेत.पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.






