• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कमी पटसंख्येच्या शाळेवर घालाराज्यभरात समूह शाळांची निर्मिती…

माणगंगा by माणगंगा
October 7, 2023
in महाराष्ट्र
0

कमी पटसंख्येच्या शाळेवर घाला
राज्यभरात समूह शाळांची निर्मिती

त-हाडी (प्रतिनिधी) :- शाळेतील कमी पटसंख्या त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी कमी पटसंख्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण होणे अशी कारणे देत राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा समूह शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे .

त्यामुळे गाव तिथे शाळा या संकल्पनेला आता छेद जाणार असून समूह शाळांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ ऑक्टोंबरची मुदत देण्यात आली आहे . शिक्षकांची खाजगी कंपन्यामार्फत कंत्राटी भरती , खाजगी कंपन्याकडून सीएसआर निधी घेऊन त्यांची नावे शाळांना देण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयावर टिकेची झोड उठली आहे त्या पाठोपाठ आता समूह शाळांचा विषय पुढे आला आहे शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार शिरपूर तालुक्यातील शिक्षक,- ८२२ , शाळा – २६९, विद्यार्थी – २५,२५१ आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून समूह शाळा निर्माण करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी समूह शाळा विकसित करण्याचे आदेश दिले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तोरमाळ तर पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे निर्माण करण्यात आलेल्या समूह शाळांच्या धरतीवर राज्यात समुह शाळा विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

समूह शाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरण

इतर अभ्यास गटांनी दर्जेदार शिक्षणासाठी सुचवलेल्या अठरा पायाभूत सुविधा पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक आणि येत्या सहावी ते आठवी पर्यंत प्रत्येक विषयासाठी त्या विषयाचे विषय तज्ञ शिक्षक उपलब्ध असतील याबरोबर संगणक खेळ व इतर कला यासाठी स्वतंत्र शिक्षक प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र वर्गखोली त्याचबरोबर वाचनालय , संगणक कक्ष , विज्ञान प्रयोगशाळा , विविध कला संगीत यासाठी बहुउद्देशीय कक्ष खेळाचे मैदान साहित्य विद्यार्थी वाहतुकीसाठी बस सेवा उपलब्ध करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे असे भारतीय जनता पक्ष तालुका माजी उपअध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य शासनाचा निर्णय चुकीचा

शिक्षण हक्क कायद्याचे आरटीई उल्लंघन करणारा हा निर्णय आहे . समूह शाळेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किंवा तीन किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध होणार नाही त्यामुळे या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे त्यामुळे राज्य शासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे
शासन निर्णय समुह शाळा बाबत माझे मत जवळ पास १५ ते २० किलोमीटर परिक्षेञातील सर्व शाळा बंद होवून एकच समुह शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे हा आरटीई कायद्याचे भंग असल्याचे मत आहे हा निर्णय गोरगरिब ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिकणार्या विद्या चे नुकसान करणारे आहे शिक्षण हक्क कारद्याला पायदळी तुडवणाचा धोरणाचा निषेध आहे

प्रभाकर माधवराव मेटकर धुळे जिल्हा सरचिटणीस प्रहार शिक्षक संघटना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी घातक

क्लस्टर शाळा सुरू करण्यामागे राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकांची पदे कमी करण्याचा उद्देश समोर आला आहे. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळण्याचा उद्देश यामध्ये अजिबात दिसत नाही असे
कुटुंब पासून विद्यार्थी दुर जाणार शिक्षकांचा पालकाचा संपर्क कमी होईल. अवगळ क्षेत्र विद्यार्थीना अडचणी येणार गुणवत्ता वर परिणाम होणार.

राजेंद्र पाटील मुख्याध्यापक डाबक्यापाडा जिल्हा परिषद मराठी शाळा नुकसानकारक निर्णय

कमी पटसंख्येच्या शाळातील विद्यार्थ्यांचे सामाजिकीकरण होत नाही हे कोणी सिद्ध केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा खाजगी उद्योगांना दत्तक देणे आणि कमी पटसंख्येच्या शाळा नजीकच्या शाळेत समाविष्ट करणे हे निर्णय गोरगरिबांचे ग्रामीण भागातील सरकारी शाळात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे आहे शिक्षण हक्क कायद्याला पायदळी तुडवणाऱ्या धोरणाचा निषेध आहे असे

अशोक बडगुजर
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी

शैक्षणिक विचाराची कत्तल

बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम २००९ नुसार कोणतेही मूल प्राथमिक शिक्षणापासून वचित राहणार नाही म्हणून संविधानाने शिक्षणाचा अधिकाकार प्रदान केलेला आहे. शिक्षणाला अतिशय महत्त्व देणारे भारत हे जगातील अग्रेसर राष्ट्र आहे.

शाहु फुले,आंबेडकर यांनी अतिशय खडतर परिस्थितीतुन जगाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.गावातील शाळा ही समूह शाळा झाली तर गाव शाळेपासून वंचित राहील.समूह शाळेत मुले नियमित जाणार नाहीत.अतिदुर्गम पेक्षा अवघड क्षेत्रात जायला पायवाट आहे परंतु रस्ता नाही अशा ठिकाणची मुले ही समूह शाळेत जाऊ शकणार नाहीत, याचा परिणाम जास्त मुलींच्या शिक्षणावर होणार. सावित्री माईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात त्रास सहन करुन स्री शिक्षणाचा वसा त्यांनी जपला त्याला हा नेमका तडा जाईल.


समुह शाळेमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतील,बालविवाहाचे प्रमाण वाढू शकते,समुह शाळेत गेल्यामुळे मुली सुरक्षित राहु शकत नाही.
शालेय व्यवास्थापन समितीला महत्त्व राहाणार नाही.माझे गाव – माझी शाळा या अस्मितेला तडा जाईल.भारतीया राज्य घटनेच्या विरुध्द हे काम होत आहे.

श्री.अनिल महिरराव
(राज्य आदर्श शिक्षक)
मुख्याध्यापक,जि.प.प्राथमिक शाळा चिलारे,
अध्यक्ष – प्रहार शिक्षक संघटना शिरपूर तालुका

जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम टिकून ठेवण्यासाठी अती दुर्गम भागातील पाडे, वाड्या, वस्त्या व फार कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील मुलांना ,
‘शाळा समूह योजना’ फार लाभदायी ठरणार आहे

गणेश सुरवाडकर गट शिक्षणाधिकारी शिरपूर पंचायत समिती शिरपूर

Views: 167
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जागतिक टपाल दिनानिमित्त

जागतिक टपाल दिनानिमित्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)