• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जागतिक टपाल दिनानिमित्त

माणगंगा by माणगंगा
October 8, 2023
in महाराष्ट्र
0
जागतिक टपाल दिनानिमित्त

त-हाडी प्रतिनिधी…. ललिता खोंडे

🚩 जागतिक टपाल दिनाच्या 🚩

        जागतिक टपाल दिन साजरा करण्याची संकल्पना आनंद मोहन नरुला या भारतीयाने मंडळी होती. सन 1969 मध्ये टोकियोत झालेल्या UPU परिषदेत हा दिन पहिल् यांदा साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जात आहे.

२४००वर्ष इसवी सन पूर्वी (टपाल )निरोप पाठवणे हि कल्पना इजिप्त मध्ये होती.
आज अंतरराष्ट्रीय टपाल दिवस .
रुक्मिणीने कृष्णाला पत्र पाठविल्याचा महाभारतात उल्लेख आहे भारतातील हे पहिले प्रेम पत्र म्हणले तर वावगे ठरणार नाही. एक काळ असा होता की लोक दिवस-रात्र पत्राची वाट पाहत असायचे
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. कधी हे पत्र चिठ्ठी म्हणून कबुतरामार्फत पाठविले जाई,
मुंबई – जगभरात ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


पत्रास कारण की… या वाक्याने सुरुवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळावयची. नातेवाईकांच्या खुशालीची वाट पाहायची. पोस्टमन काका आल्यास त्यांच्यामागे धावत धावत काका आमच्या आत्याचं पत्र आलं का ? आमच्या मावशीचे पत्र आले का? असा प्रश्न विचारायचं. आमच्या लहानपणी आजोबांचं पत्र मला चांगलंच लक्षात आहे .त्यातला मजकूर काळाच्या ओघात विसरून गेला आहे . पण त्यांचं ते टपोऱ्या मोत्या सारखं सुंदर वळणदार अक्षर . ते साचातून छापल्या सारखं वाटायचं . ते अक्षर कधीच मनातून पुसले जात नाही .


वैज्ञानिक क्रांतिमुळे आज संपुर्ण जग जवळ आले आहे. वृध्द लोक सांगतात की, जेव्हा एखादा टेलीग्राम यायचा तेव्हा एक संकेत असायचा की, काहीतरी वाईट घडले आहे आणि जेव्हा एखादे पत्र यायचे तेव्हा लोक समजून जायचे की, काहीतरी आनंदाची बातमी आहे.

       पत्र येण्याची आम्ही नेहमीच वाट पाहत असायचो. पत्र मिळायच्या आधीची हूर हूर वगैरे म्हणतात ना ती फक्त आता सांगून शब्दात नाही व्यक्त करता येणार. त्या पत्रात आपलेपणा होता. ती व्यक्ती जणू तुम्हाला मिठी मारून  किंवा तुमच्या शेजारी बसून आपल्याशी संवाद साधते असाच भास व्हायचा.  कधी कधी तर एखाद्या  सिनेमात जस दाखवतात ,तसा पत्रात तो चेहराही दिसायचा.जसे काही पत्र लिहिणार्या  व्यक्तीला जणू भेटून यायचो त्याच्याच घरी जाऊन.  

         आकाशी रंगाचे अंतर्देशीय पत्र , फोल्डर होणार, त्याची घडी कुठे फाडायची त्याची पण एक पद्धत होती. कुठूनही फाटलं तर मजकूर वाचता येणार नाही हे निश्चित.

      या पत्रातून कधी आनंदवार्ता यायची तर ,कधी मनाला रुखरुख लावणारी व्यथित करणारी बातमीही. कधी परीक्षेचा रिझल्टही कळायचा. तर कधी कुणाच्या घरी नव्याने आगमन झालेल्या पाहुण्यांबद्दल समजायचं. अनेक भावभावना या पत्रातून आपल्यापर्यंत पोहोचत होत्या.एखादी मुलगी पाहून गेल्यानंतर पसंती किंवा नकार या पत्रांच्या माध्यमातूनच कळायचा. हा अनुभव सांगण्यासाठी आता त्या काळातच जावे लागेल. तो अनुभव शब्दात सांगून नाही कळणार.

           चांगल्या बातम्या पत्राच्या माध्यमातून देताना  पोस्टमन बरोबर निर्माण झालेले एक नवीनच नातं होतं. अविरतपणे चालणारे, न थकता .

त्यांचा तो टिपिकल खाकी ड्रेस , खांद्याला ती त्यांची नेहमीची खाकी रंग असलेली बॅग, त्यातून प्रत्येक पत्र अगदी अचूक पत्त्यावर पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मनापासून नमस्कार करावासा वाटतो .
मला यावेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेले गाणं आठवतं. डाकियाँ डाक लाया….. खुशी का पयाम कही…. कही दर्दनाक लाया…..
व्हाट्सअप फेसबुक या माध्यमांनी कितीही प्रगती केली तरी, हाताने लिहिलेल्या पत्राची सर या माध्यमाला नाही यायची.आपल्या बोटातून पत्रावर आकार घेणारी अक्षर, ही शाईत नव्हे तर आपल्या भावनांमध्ये ओथंबलेली असतात. त्यातला आपलेपणा काही वेगळाच होता.माणसाने आधुनिक माध्यमांना जरी आपलेसे केले असले तरीही या पत्राची व पोस्टमनची अनुपस्थिती ही कायमच जाणवत राहणार आहे.


पोस्टमन घरातल्या फटीतून टाकलेल्या व जमिनीवर पडलेला पत्र फोडून हातात घेऊन वाचण्यात एक वेगळाच आनंद होता .आज हे लिहिताना बालपणीचा काळ परत आपण जगतोय असे वाटते . पत्रातल्या अक्षरांचा मनात दरवळणारा सुगंध आताच्या काळात सोबत नसण्याची रुक रूक , आणि तेव्हाच्या पत्राच्या अस्तित्वाची आठवण आजही आल्याशिवाय राहत नाही.15 पैशांच्या त्या पत्रातून खूप आनंद मिळायचा. मात्र, काळाच्या ओघात ही पत्रे आता काळाच्या पडद्याआड जमा झाली आहेत.


पोस्टमन काकाच्या पाठिमागे फिरुन आपल्या मामाचं पत्र मिळविण्यात, आपल्या आत्याची खुशाली ऐकण्यात जो आनंद होता, तो आनंद ही टपालासोबतच नाहीसा झाला आहे.


ललिता खोंडे त-हाडी पत्रकार
मो-९४२१९२९३६०

Views: 124
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दयाराणी खरात यांना सातारा जिल्हा आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान………….पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते साताऱ्यात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण.

दयाराणी खरात यांना सातारा जिल्हा आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान.............पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते साताऱ्यात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)