• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

इस्त्राइलवरील ‘हमास’च्या हल्ल्याचा निषेध; दहशतवाद्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसचाही निषेध !

माणगंगा by माणगंगा
October 11, 2023
in मुंबई
0
इस्त्राइलवरील ‘हमास’च्या हल्ल्याचा निषेध; दहशतवाद्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसचाही निषेध !

इस्त्राइलवरील ‘हमास’च्या हल्ल्याचा निषेध; दहशतवाद्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसचाही निषेध !

जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्त्राइलच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता ! – हिंदु जनजागृती समिती

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुबई: नुकतेच पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी इस्त्राइलवर हजारो रॉकेटसह, जमिनीवरून, तसेच सागरी मार्गाने घुसून आक्रमण केले आणि शेकडो निष्पाप इस्रायली नागरिकांच्या हत्या केल्या. या आतंकवादी आक्रमणाचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते आणि जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्राइलच्या पाठीशी उभे रहाण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मांडली आहे. भारतातही ज्यू बांधव शांततेने रहात आहेत. हिंदु जनजागृती समिती ज्यू बांधवांच्या पाठिशी आहे, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

आज इस्राइलमध्ये आक्रमण झाले, यापूर्वी काश्मीरमध्येही अशी आतंकवादी आक्रमणे होत होती; उद्या अन्य कुठेही अशी आक्रमणे होऊ शकतात. जिहादी आतंकवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. त्याचा जागतिक स्तरावर विरोध व्हायला हवा. या दृष्टीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी त्वरित इस्राइलवरील हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या समर्थनाची अर्थात् जिहादी दहशतवादाच्या विरोधात भूमिका घेतली. भारत सरकारच्या या भूमिकेचेही हिंदु जनजागृती समिती समर्थन करते. दुर्दैवाने काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. एकीकडे पॅलेस्टाइनची जमीन, स्वशासन आणि आत्मसन्मान अन् प्रतिष्ठा यांनी जीवन जगण्याचा अधिकारांचे समर्थन करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली; मात्र याच पॅलेस्टाइनच्या भूमीवरून ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्राइलवर आक्रमण करत सहस्रो निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्या, महिलांना पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केले. याबद्दल काँग्रेसने चकार शब्द काढलेला नाही. जर पॅलेस्टाइनला आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा यांनी जगण्याचा अधिकार आहे, तर मग तो इस्राइली जनतेला नाही का ? इस्राइलवर आक्रमण झाल्यावर त्यांनी प्रतिकार न करता दुसरा गाल पुढे करत ‘गांधीगिरी’ करणे काँग्रेसला अपेक्षित आहे का ? काँग्रेसची ही भूमिका जिहादी दहशतवादाचे समर्थन करणारी आहे. त्यामुळे इस्राइलवरील हल्ल्याबद्दल जेवढा निषेध ‘हमास’चा करायला हवा, तेवढाच निषेध जिहादी दहशतवादाचे समर्थन करणार्‍या काँग्रेसचाही करायला हवा, असे समितीने म्हटले आहे.

याचप्रमाणे अलिगढ मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनीही इस्राइलच्या विरोधात मोर्चे काढले, ही बाब अतिशय गंभीर आहे. यातून अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचे विद्यार्थी हे ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे उघडउघड समर्थन करत आहेत. या घटनेची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एन्.आय्.ए.च्या) माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशीही आम्ही मागणी करत आहोत, असे श्री. शिंदे यांनी या वेळी म्हटले आहे.

Views: 134
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेत आघाडी.

कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेत आघाडी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)