विभुतवाडीतील वार्ड क्रमांक 1 चे सर्वसाधारण गटातील अधिकृत उमेदवार रंजना मोटे यांच्या नारळ चिन्हा वर बटन दाबून विजयी करावे… सागर पाटील
आटपाडी प्रतिनिधी
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 या निवडणुकीमध्ये जय हनुमान विकास परिवर्तन पॅनलचे वार्ड क्रमांक एकचे सर्वसाधारण स्त्री गटातील उमेदवार रंजना तुकाराम मोटे यांच्या नारळ चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आव्हान युवा नेते सागर पाटील यांनी केले आहे.

श्रीमती रंजना तुकाराम मोटे यांचे पती तुकाराम मोटे हे सामाजिक कार्यामध्ये भाग घेत होते. गावातील तरुणांना उद्योग मिळावा म्हणून गावांमध्ये त्यांनी दूध संस्थेची स्थापना केली होती. तसेच अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. शांत आणि सरळ मार्गाने राहणारे तुकाराम मोटे यांच्या पत्नी रंजना तुकाराम मोटे या वार्ड क्रमांक एक मधून सर्वसाधारण स्त्री गटातून निवडणुकीमध्ये उतरले आहेत.
यांचे चिन्ह नारळ आहे. तरी वार्ड क्रमांक एक मधील सर्व मतदान बंधू भगिनींना नम्र विनंती सफरचंद ,टेबल ,कपाट व नारळ या चिन्हा वर बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन युवा नेते सागर पाटील यांनी केले आहे







