बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजन योजना बंद …
बांधकाम कामगारावरती आली उपासमारीची वेळ
आटपाडी प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजना दिली जात होती. ती योजना ०१ नोव्हेंबर २०२३ पासून बंद करण्यात येत आहे. अशा सूचना जस्ट किचन यांना पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात. त्यानुसार मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या ई- निविदेमध्ये पात्र ठरलेल्या निविदाकार संस्थामार्फत मध्यान्ह भोजन पुरवठा करण्यात येत होता.
परंतु मध्यान्ह भोजन योजना दि. ०१ नोव्हेंबर २०२३ पासून बंद करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सदरची मध्यान्ह भोजन योजना दि. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
अनेक बांधकाम कामगार यांना भोजन पुरवले जात होते परंतु ही योजना बंद झाल्यामुळे अनेक बांधकाम कामगारावरती उपासमारीची वेळ येणार आहे तरी शासनाने मध्यान्ह भोजन योजना पूर्वत सुरू ठेवावी अशी मागणी बांधकाम कामगाराकडून होत आहे.
–
.







