• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जीवन समृद्ध बनवण्यासाठी अधिकार वापरा-ॲड.सचिन सातपुतेलिंगीवरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

माणगंगा by माणगंगा
December 31, 2023
in सांगली
0
जीवन समृद्ध बनवण्यासाठी अधिकार वापरा-ॲड.सचिन सातपुतेलिंगीवरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

जीवन समृद्ध बनवण्यासाठी अधिकार वापरा-ॲड.सचिन सातपुते
लिंगीवरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न


आटपाडी/प्रतिनिधी:


आटपाडी तालुका विधी सेवा समिती व ग्रामपंचायत लिंगीवरे यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगीवरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन/विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले. विधी सेवा समितीमार्फत ॲड.सचिन सातपुते व आटपाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष कदम यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.


लिंगीवरे ग्रामपंचायत परिसरातील सभामंडपात आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्धन झिंबल,आटपाडी न्यायालयातील सलमान शेख,सरपंच सौ.सुमन झिंबल,माजी सरपंच आगतराव खांडेकर,ग्रामपंचायत सदस्य सागर खताळ,सुभाष झिंबल, संजीवकुमार यादव,दादासाहेब मदने,मारुती खटके, मधुकर खताळ, विलास बिडगर, रावसाहेब झिंबल,महादेव सूर्यवंशी, बाळासाहेब बनसोडे, वैभव सूर्यवंशी,पैगंबर शेख, गणेश भोकरे,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक जयंत खंडागळे, कर्मचारी पोपट घोडके यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. लक्ष्मण खटके यांनी स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तसेच आभार मानले.


शिबीरात मार्गदर्शन करताना ॲड.सचिन सातपुते म्हणाले, देशातील व खेड्या-पाड्यातील लोकांना कायद्याविषयी ज्ञान मिळावे, न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात येते.अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे जनतेच्या सेवेसाठी लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले मोठे साधन आहे.त्याचा विकास करण्यासाठी तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. सरकारच्या चुकीच्या कायद्याबाबत न्यायपालिकेत दाद मागून तुम्ही कायदा रद्द करू शकता, एवढे मोठे अधिकार नागरिकांना दिले आहेत.नागरिकांना विविध अधिकार दिले आहे. नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.

शेतकऱ्यांसाठीही विविध योजना व कायदे बनवलेले आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्याच्या नियम व अटींचे आणि त्यातील कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे. सर्व लोकांनी गुन्या-गोविंदाने राहिले पाहिजे आणि राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, हे देशाचे उद्दिष्ट आहे.

जनतेने शासन संस्थेला आदेश दिले पाहिजेत अशी तरतूद आहे. शासनाने कसे काम केले पाहिजे? हे तुम्ही सांगितले पाहिजे, आपल्या गरजांविषयी लोकप्रतिनिधीमार्फत सरकारला माहिती दिली पाहिजे,एवढे मोठे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत.कोणतीही माहिती मिळवण्याचे अधिकार तुम्हाला आहेत, त्याचा लाभ घेतला पाहिजे. आपल्या हक्क व अधिकारांची आपणाला जाणीव झाली पाहिजे,तरच या सर्व गोष्टी होणार आहेत.कायदा आपणास माहित आहे,असे गृहीत धरूनच आपण चालायचे आहे. त्यामुळे आपण माहिती उपलब्ध करून घेऊन स्वतःचा विकास केला पाहिजे आणि अनेक योजनांचा लाभ घेतला पाहिजे,आपले जीवन समृद्ध बनवले पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये भर घातली पाहिजे.


आटपाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष कदम बोलताना म्हणाले, रमाई आवास घरकुल योजनेचे उद्दिष्ट मर्यादित नाही, त्यामुळे त्याचे अटीनुसार प्रस्ताव द्यावेत.मंजूर झालेली घरकुल तातडीने पूर्ण केली पाहिजेत. घरकुलाबरोबर उपजीविकेचे साधनही निर्माण झाले पाहिजे.फक्त व्यवसायासाठी गाळा काढल्यास लाभ मिळणार नाही.

घरकुलाची कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर पुढील उद्दिष्ट दिले जात नाही. त्यामुळे अडचणी येतात.लाभार्थ्याने घरकुल वेळेत पूर्ण नाही केले तर बोजा चढवला जाईल व पूर्णत्वानंतर तो बोजा काढला जाईल.त्यांनी शिबीरामध्ये विविध घरकुल लाभांच्या योजनांची माहिती सविस्तर सांगितली.

Views: 173
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला रतन टाटांचा वाढदिवस साजरा……..टाटांच्या सेल्फी पॉइंटची केली मागणी

आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला रतन टाटांचा वाढदिवस साजरा........टाटांच्या सेल्फी पॉइंटची केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)