आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला रतन टाटांचा वाढदिवस साजरा
टाटांच्या सेल्फी पॉइंटची केली मागणी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई -भारताचे जगप्रसिद्ध उद्योगपती आदरणीय, वंदनीय रतनजी टाटांचा ८६ वा वाढदिवस सलग सहाव्या वर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुंबईतील माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला۔
इंडिया मिडिया लिंक अँड इव्हेंटस् मॅनेजमेंटच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार तसेच समाजसेवक के.रवी (दादा) यांच्यासह स्वामी बिजवनदास गुरुजी, प्रसिद्ध माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी, अभिनेता अली खान प्रसिद्ध शायर सागर त्रिपाठी,प्रसिद्ध माजी पोलिस अधिकारी तसेच वकील सुभाष सुर्वे,सुशील जाधव, बाॅलीवुड अभिनेता अली खान,अभिनेता अरविंद भानुशाली (ज्युनियर देव आनंद ) समाजसेवक आरिफ भाई आदि मान्यवर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात सागर त्रिपाठीसह धनराज वंजारी, सुभाष सुर्वे यांच्यासह अनेकांनी रतनजी टाटांसह के۔ रवि दादांचेही आपल्या भाषणात भरभरून कौतुक केले۔ याप्रसंगी इतिहासात प्रथमच रतनजी टाटांवर लिहिल्या गेलेल्या मनोरंजनात्मक गाण्याचे प्रदर्शन करण्यात आले तसेच इतिहासात प्रथमच रतन टाटांवर मुशायरा, कविता व प्रसिद्ध हास्य कलाकार दिवेश शिवडकर आदिंनी आपापल्या कलेद्वारे रतनजी टाटांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या۔ तसेच याप्रसंगी रतनजी टाटा यांच्या वाढदिवसा निमित्ताने टाटा रूग्णालयातील कॅन्सर रूग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विशेषत: टाटांच्या वाढदिवसा निमित्त के.रवि दादांनी उपस्थितांसमोर मिडियांच्या माध्यमातून देशाला सामाजिक संदेश देताना शासनाकडे मुंबईत रतन टाटांचा सेल्फी पॉइंट बनविण्याकरीता जागेच्या परवानगीची मागणी केली. आणि जनतेस आव्हान केले की, उद्यापासून २९ डिसेंबर २०२३ ते २८ डिसेंबर २०२४ पर्यंत रतन टाटांच्या वाढदिवसा निमित्त निदान फक्त १० मिनिटे जनतेने आप आपल्या घरातील वीज बंद केली तर देशामध्ये अर्बो युनिट विजेची बचत होईल. ज्यामुळे टाटा पावरची वीज मुंबई शहराला स्वस्त्यात मिळेल. त्याचबरोबर के۔ रवि दादांनी आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींना विनंती केली की, येणाऱ्या वर्षांत रतनजी टाटांचा वाढदिवस देशाने सामाजिक पातळीवर वेग वेगळ्या स्वरूपात व उत्साहाने साजरा करावा.
सदर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला अधिक आनंदमयीॆ करण्याकरिता डॉ. विजय सानप, राहुल रवि, पत्रकार राजेंद्र साळसकर, पत्रकार तानाजी कांबळे, शरद रणपिसे, राम तांबे, विलास घडशी, प्रभाकर (बाळा) वडियार, दिपक पडीये, डॉ.रतन पवार, रमजान सिद्धिकी, विक्रांत कश्यप, राहुल खैरे, राजा सोनटक्के, सौ۔ अनिता पाटोळे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.







