*ज्या धर्मात जाती व्यवस्था नाही ते धर्म हिंदूच्या जातीचे आरक्षण नियमबाह्यरित्या घेत आहे त्या वर छगन भुजबल व जरांगे पाटील यानी बोलावे
… हिंदू धर्माच्या एकता करिता आपापसात वादविवाद करू नये* – अजय सिंह सेंगरजगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७मुंबई:- जरांगे पाटील व छगन भुजबळ यानी आपापसात विवाद निर्माण केल्याने हिन्दू धर्मात फ़ूट निर्माण झाली आहे. जर हिन्दूच्या मतात फ़ूट निर्माण झाली तर हिन्दू विरोधी शक्ति सत्ता मध्ये आली तर हिन्दू करिता नुकसानदायक ठरेल. 370 सारखे कलम पुन्हा लागू होऊ शकते व तीन तलाक वर जी बंदी आणली ती रद्द होऊ शकते. जात व्यवस्था फक्त हिंदू धर्मात आहे हे राज्य घटना सांगते.
इतर धर्मात जाती व्यवस्था नसल्याने ते हिंदूंच्या जातीची आरक्षण घेत आहे ते रद्द करावे अशी मागणी जरांगे पाटील व छगन भुजबळ यांनी करावी ऑटोमॅटिक मराठ्यांना आरक्षण प्राप्त होईल 50% च्या आत मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण फक्त हिंदू धर्माच्या जातींनाच दिलेले आहे. बाकी कोणत्याही धर्माला त्यांनी आरक्षण दिलेले नाही. म्हणून जातीय आरक्षण हे फक्त हिंदू करिताच आहे.काँग्रेस सरकारने अल्पसंख्याकांच्या मता करिता ज्या हिंदूंनी हिंदू धर्म त्याग करून दुसरे धर्म स्वीकारले त्यांना हिंदू धर्माच्या जातीचे आरक्षण देणे हे संविधान विरोधी कृती आहे. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तो एक प्रकारचा अपमानच आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती मुक्त देशाचे स्वप्न बघितले होते. जातीय आरक्षणामुळे प्रचंड प्रमाणामध्ये हिंदू मध्ये विषमता व फुट निर्माण होत आहे.जातीय आरक्षणामध्येच जे अल्प उत्पन्न वाले आहे त्यांनाच उत्पन्नाच्या आधारावर आरक्षण देणे योग्य ठरेल. ज्या जातींना आरक्षण आहे त्या जातीतील गर्भ श्रीमंत अर्थात उच्च आर्थिक उत्पन्न व्यक्तींना आरक्षण देऊ नये.
हे तत्व जर अमलात आणले तर आरक्षणाची मर्यादा 50% च्या आत होईल असे वक्तव्य महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केलेली आहेपुढे ते म्हणतात की इतर धर्मात जातीव्यवस्था नाही मग इतर धर्म हिंदूंच्या जातीचे आरक्षण इतर धर्म कसे घेते हे जरांगे पाटील किंवा छगन भुजबळ का नाही लक्षात घेत ? का आपण दोघे हिंदू मध्ये फूट पाडत आहोत ? ज्या धर्मात जाती व्यवस्था नाही ते धर्म हिंदूच्या जातीचे आरक्षण नियमबाह्यरित्या घेत आहे , यावर लक्ष घातल्यास क्षणार्धात “मराठा आरक्षण” प्राप्त होईल असे अजय सिंह सेंगर, प्रमुख महाराष्ट्र करणी सेना यांनी स्पष्ट केले आहे.







