आज व्यंकटेश क्रिडा महोत्सवाच्या क्रिडाज्योतचे प्रज्वलन करून बोराडी ते शिरपूर मोटरसायकल रॅली काढण्यात आली…
बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) दि.2 जानेवारीपासून शिरपूर येथे व्यंकटेश क्रिडा महोत्सवाला सुरुवात होत असून त्यानिमित्त आज किसान विद्या.प्रसारक संस्थेचे मा.सचिव दादासाहेब विश्वासराव रंधे यांच्या जयंतीनिमित्त बोराडी येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रिडा मैदानावरील स्मृतिस्थळावर अभिवादन करून क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली राष्ट्रीय,राज्य,विद्यापीठ स्तरावरील खेळाडूंच्या हस्ते शिरपूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रिडा मैदानावर क्रिडाज्योतचे रोवण करण्यात आले. याप्रसंगी बोराडी ते शिरपूर सुमारे 22 किलोमीटर पर्यंत ज्योत घेऊन मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत पुरुषांसह महिलांनीही सहभाग घेतला होता.
यानिमित्ताने पांढऱ्या गणवेशात फेटा बांधुन मोटरसायकल मशाल रॅली काढण्यात आली.रस्त्यातील गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून क्रिडाज्योतचे नांदेड,वाडी,वाघाडी, शिरपूर कॉलेज फाटा,निमझरी नाका, करवंद नाका, गुजराथी कॉम्प्लेक्स,इ.ठीकाणी स्वागत करण्यात आले.तेथुन सौ.सावित्रीबाई कन्या विद्यालय, कॉलेज सीबीएससी कॉलेज मार्गाने शिरपूर येथील शिव छत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रिडा मैदानावर रॅलीचे आगमन झाले.
याप्रसंगी किसान विद्या.प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे,सचिव निशांत रंधे,खजिनदार आशाताई रंधे,पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,जि.प.सदस्या जताबाई पावरा,पंचायत समिती सदस्या सरिताताई पावरा,सरपंच सुकदेव भिल,
मंडळाचे सचिव रोहित रंधे,विश्वस्त शामकांत पाटील,धुळे-नंदुरबार ग.स.बँकेचे संचालक शशांक रंधे,उद्योजक हर्षवर्धन रंधे,धुळे-नंदुरबार मध्यवर्ती बँकेच्या संचालक सिमा रंधे, प्राचार्या सारिका रंधे,विद्या रंधे,हर्षाली रंधे,रोहीणी रंधे,गौरी रंधे,विनायक देवरे,बी.डी.पाटील,राधेश्याम दायमा,आर.टी.पाटील,निश्चल पाटील,प्राचार्य एस.एस.राजपुत,मा.प्राचार्य एस.एन.पटेल,गोकुळ कुंभार,ज्ञानेश्वर बडगुजर,
संजय जगदेव,दिलिप देवरे,
रविंद्र शिंदे,भागवत पवार,दिपक रंधे
इ.उपस्थित होते.
या रॅलीसाठी किसान विद्या.प्रसारक संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील,के.डी.बच्छाव,भैय्या माळी,सिताराम माळी,प्राचार्य विकास पाटील,प्राचार्या सुचित्रा वैद्य,उपप्राचार्य कल्पेश वाघ,यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खेळाडू, विविध शाखांचे शाखाप्रमुख,क्रिडाशिक्षक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
*व्यंकटेश २०२४ चा किडा स्पर्धांचे उद्घाटन*
दि.2 जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता शिरपूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रिडा मैदानावर व्यंकटेश क्रीडा महोत्सव २०२४ चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डाॅ.विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण मंत्री व शिरपूर तालुक्याचे विकासरत्न आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.हिनाताई गावित,आमदार काशीराम पावरा,शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सरपंच,उपसरपंच,विविध पदाधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या क्रिडा स्पर्धेसाठी कब्बडी,खो-खो,व्हाॅलिबाॅल,क्रिकेट या सांघिक खेळासाठी प्राथमिक गटातील १२ संघ, माध्यमिक गटातील २३ संघ,जूनियर गटातील १४ संघ व सीनियर गटातील ७ संघ असे एकुण ५६ शाखेतील १४५ संघांनी तसेच थाळीफेक,गोळाफेक,भालाफेक,धावणे,रिले,बुद्धीबळ,कॅरम,बॅडमिंटन,बाॅक्सिंग,या वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळाडु मुला मुलींनी घेतला आहे. सदरचा क्रीडा महोत्सव तीन दिवस चालणार असून तिसऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.







