मिरज तहसीलदार कार्यालय मधील अन्न पुरवठा विभागातील कामचुकार, बेशिस्त, निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करा अन्यथा १४ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण…
मिरज
दि. ११ ऑगस्ट २०२१
वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने देि. ४ ऑगस्ट २०२१ व दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी मिरज तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली. यांना कामचुकारपणा,निष्क्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करणे बाबत निवेदन देण्यात आले होते. तरी या संदर्भात कोणतेही कारवाई अद्यापही करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवार दि.१० ऑगस्ट २०२१ रोजी वरील विषया संदर्भात कोणती कारवाई करण्यात आली आहे हे विचारणा करण्यासाठी मिरज तहसीलदार कार्यालयातील अधिकारी श्री. तोडकर यांना निवेदना बाबतीत विचारणा केली असता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करण्यात आले,जबाबदार असणारे अधिकारी यांना त्यांच्या कर्तव्ये चे जबाबदारी नसल्याचे तसेच नागरिकांच्या अडचणीचे काही देणे घेणे नसल्याचे व त्या जबाबदार अधिकारी यांना काही फरक पडत नसल्याचे त्या अधिकारी यांनी असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही याउपर आरेरावी ची भाषा वापरण्यात आली.यावरून असे दिसून येते की सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी श्रमिक यांचे जीवन मरणाचे प्रश्न व अडचणीना प्रशासन गंभीर घेत नाही. तरी या विषयातील संबंधित अधिकारी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करावी व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करणारे अधिकारी श्री. तोडकर यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. १४ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हाधिकारी सांगली कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी सांगली जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा संघटक संजय कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, सचिन कोलप, संजय कांबळे, परशुराम कांबळे,मयुर कांबळे आदी उपस्थित होते.







