• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोविड काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

माणगंगा by माणगंगा
August 11, 2021
in मुंबई
0
कोविड काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

कोविड काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई

दि.11 : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच डॉक्टर म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची शैक्षणिक फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांची आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर ढोबळे- पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधव, जनरल सेक्रेटरी डॉ.धनराज गीते, ॲडिशनल जनरल सेक्रेटरी डॉ. अक्षय चावरे, राज्य समन्वयक डॉ. निखील कांबळे, जॉईंट सेक्रेटरी डॉ. चेतनकुमार आद्रट उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून निवासी डॉक्टर्स रात्रंदिवस कोविड -19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे या डॉक्टरांची शैक्षणिक फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत तसा प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतिगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतिगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतील, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

सेंट्रल मार्ड मार्फत शैक्षणिक फी माफी, कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुगणालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णाललयातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे,वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता अशा काही मागण्या असलेले निवेदन यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांना देण्यात आले.

Views: 209
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
चिपळुण एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा जनजागृती सेवा समितीच्यावतीने “गौरवपत्र “देऊन सन्मान. –

चिपळुण एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा जनजागृती सेवा समितीच्यावतीने "गौरवपत्र "देऊन सन्मान. -

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)