सर्व धार्मिक उत्सव साजरे करणारे श्रीराम मंदिर
सन १९९८ साली मंदिराची स्थापना प्रभु श्रीराम जी, लक्ष्मण जी व माता सीता यांची प्राण प्रतिष्ठापना…
त-हाडी-
वर्षाचे बारा महिने दररोज सकाळ संध्याकाळ श्रीराम नामजापासह विविध धार्मिक उत्सव अविरतपणे सुरू ठेवणारे त-हाडी (शिरपूर) येथील श्रीराम मंदिराची स्थापना २२ /५/ १९९८ मध्ये करण्यात आली होती.
तब्बल २५ वर्षांपासून या मंदिरात दर्शनासाठी दररोज असंख्य भक्तांची गर्दी रिघ पाहायला मिळते.
या मंदिरात रामजी, लक्ष्मणजी, माता सीता व हनुमंतरायां च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
हे मंदिर मोठ्या परिसरात बनवण्यात् आलेले आहे. सदर परिसराला सुरक्षा कुंपण देखिल आहे.
या ठिकाणी हनुमान मंदिर, व महादेवाचे मंदिर सुद्धा आहे.
अनेक वर्षांपासून या मंदिरात सेवा देणारे अन् मंदिरातील राम दरबारातिल सर्व चारही मूर्ती जयपुर येथून उत्कृष्ठ कारागीर दवारे बनवलेली मूर्ती आणून दान करणारे दानशूर व्यक्तीमत्व व पुजारी कै. पौलदसिंग ग़ुमानसिंग गिरासे यांनी अविरतपणे पूजेची सेवा दिली.
सन २२ फेब्रुवारी २०२०,मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर श्री आधारबापू कोळी हे पुजारी व सेवेकरी म्हणून ५ वर्षांपासून या मंदिरात समर्पित वृत्तीने सेवा देत आहेत.
दरवर्षी मंदिराच्या वतीने राम जन्मोत्सव, हनुमान जयंती, दिवाळी, अन्नकुट भागवत कथेचे आयोजन, दुर्गा उत्सव, गणपती उत्सव, कृष्णाष्टमी होतिकोत्सव तसेच श्रावण महिन्यात गायत्रीमंत्र, श्रावण सोमवार, पुजेचे आयोजनही केले जाते मंदिरात दर्शनासाठी राज्याच्या बाहेरचे सुध्दा भाविक येत असल्याने भक्तांसाठी मोठे भक्तनिवास व जेवणाची मोफत सेवा संस्थेच्या वतीने सुरू आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक पायीदिंडीतील भविकांना भोजनसह सर्व सेवा नियमीत पूरवण्यात येत असतात त्यमुळे मंदिराचे संपूर्ण पंचकृषीत नाव लौकिक आहे. मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे , लाईटचे व्यवस्था , आहे
२२ जानेवारीला अयोध्यातील मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना त्या दिवशी त-हाडी येथे संस्थानच्या वतीने सकाळ पासून सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम ढोल ताशचे वादन, शौभा यात्रा, रोषणाई, महाआरती, आतिषबाजी, व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या आनंदोत्सवात सर्व भक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष सचिव आदी विश्वस्तांनी केले आहे…







