“उपोषण कामगारांचे आश्वासन मनसेचे”
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: ॲक्सिस बँक संयुक्त कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी दिनांक १ जानेवारी २०२४ पासून आझाद मैदान येथे सुरू केलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे व शैलेश पाटणकर यांनी भेट दिली.
सदरील भेटी वेळी कामगारांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या व मागण्या समजून घेण्यात आल्या. लवकरच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ॲक्सिस बँकेला चर्चेसाठी तयार करू आणि तुमच्या शिष्टमंडळाला सोबत घेवून आदरणीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट घडवून आणू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
कामगारांचा प्रश्न असला की महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना नेहमी कामगारांच्या पाठीशी असते हे आज पुन्हा दिसून आले.







