प्राण केला तरी चालेल पण साखरेचा ट्रक बाहेर जाऊ देणार नाही .शेतकरी संघटना…
उसाला पहिली उचल 3 हजार रुपये जाहीर करा.
कारखान्याने निर्णय न घेतल्यास आंदोलन चिघळणार
आटपाडी प्रतिनिधी
राजेवाडी ता.आटपाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी यांनी शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी अन्यथा प्राण गेला तरी चालेल पण साखरेचे ट्रक गेटच्या बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनेचे खनापुर आटपाडी विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर व शेतकऱ्यांनी घेतली आहे. यासाठीच कालपासून नेतृत्वाखाली कारखान्याच्या गेट समोर आंदोलन सुरू केले आहे.
अध्यक्ष गणेश जुगदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होताच गव्हाण बंद करून साखर कारखान्या बाहेर जाऊ दिली नाही..शेतकरी संघटनेने गव्हाण बंद केली होती पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी संघटनेने गव्हाण चालू करून दिली आहे.
तर शेतकरी संघटनेने ठरल्याप्रमाणे साखर अडवणे साखर गेट च्या बाहेर जाऊ न देणे आंदोलन सुरू केले आहे . तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बरोबर चर्चा केली असता म्हणाले की प्राण गेला तरी चालेल पण कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे .
जोपर्यंत ऊसाला पहिली उचल 3000 रुपये जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार.आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
आज साखर भरण्यास ट्रक आला होता ,पण शेतकरी संघटनेने ट्रक मध्ये साखर भरून दिली नाही तो ट्रक परत पाठवण्यात आला. साखर भरण्यासाठी कितीही ट्रक आले तरी ते आम्ही परत पाठवणार साखर ट्रक मध्ये भरू दिली जाणार नाही. जोपर्यंत पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार या भूमिकेवर शेतकरी संघटना ठाम आहे.







