तऱ्हाडी विद्यालयात सिंधूआक्का क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत उपक्रम
तऱ्हाडी:- स्व अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु सायन्स कॉलेज तऱ्हाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू आक्का क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे खजिनदार पु़ंडलिक धनगर व प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष सुभाष भामरे व सचिव विजय भामरे संचालक प्रशांत भामरे सुतगिरणी संचालक सुदाम भलकार. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक ओंकार दशरथ पाटील. मुख्याध्यापक एन. एच. कश्यप .उपसरपंच उजनताई अहिरे.शेतकरी संघर्ष स़ंघटनेचे उपाध्यक्ष तुळशीराम भामरे माजी वि.का.सो चेअरमन स़ंजय जाधव युवा नेतृत्व विशाल क़़ऱंके कृषी मित्र किरण भामरे.अशोक वानखेडे व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी मशालज्योत पेटवून व आकाशात बलून उडवून क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विविध देशी खेळ त्यात शंभर मिटर धावणे. कबड्डी. विटी दांडू. थाळीफेक. गोळा फेक.असे विविध खेळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.एच.कश्यप सुत्रसंचलन रावसाहेब चव्हाण कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी ए.एम. सोनवणे भावेश पाटील प्रविण शिंदे व्हि.डी.पाटील. ए के पाटील निता पाटील यांनी केले







