महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओव्हरलोड वाहतूक डंपर बंद करण्याची मागणी
आटपाडी तालुक्यात ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वहानामुळे रस्ते खराब होत आशेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना अध्यक्ष आटपाडी तालुका यांच्या वतीने उपप्रादेशिक अधिकारी सांगली यांना आटपाडी तालुक्यात ओव्हरलोड वाहतूक करणारा डंपर संदर्भात निवेदन देण्यात आले.
यामध्ये आटपाडी तालुक्यात ओव्हरलोड वाहतूक करणारे डंपर अतिशय वेगाने वाहत असून त्या डंपर ला किन्नर ही नसतो व डंपर वाहतुकीची क्षमता 19 ते 22 टनाचीअसते व ते डंपर 40 ते 45 टनानी वाहतात त्यामध्ये भरलेली खडी किंवा मुरूम त्यावर ताडपत्री टाकलेली नसते .
त्यामुळे पाठीमागून चालणारे वाहन धारकाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यासंदर्भात उपप्रादेशिक विभाग सांगली यांच्याकडून कारवाई न झाल्यास आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या चार ते पाच दिवसात डंपर रस्त्यावर कारवाई होईपर्यंत थांबू असे न झाल्यास आटपाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यास भाग पाडू असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना अध्यक्ष दाजी खिलारी, आटपाडी तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड सर्व पदाधिकारी उपस्थित होते







