• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धान्य साठविण्यासाठी वापरली जाणारी कणगी झाली कालबाह्य..!

माणगंगा by माणगंगा
March 7, 2024
in महाराष्ट्र
0
धान्य साठविण्यासाठी वापरली जाणारी कणगी झाली कालबाह्य..!

धान्य साठविण्यासाठी वापरली जाणारी कणगी झाली कालबाह्य..!

 त-हाडी- प्रतिनिधी

पूर्वी ज्वारी, बाजरी साठविण्याच्या विविधांगी पद्धती उपयोगात आणल्या जात होत्या. यामध्ये कणगे हा महत्त्वपूर्ण प्रकार होता. या कणग्यांमध्ये जवळपास आठशे ते हजार क्विंटलपर्यंत धान्य साठवून ठेवले जात असे. आता धान्य साठवणुकीसाठी लोखंडी कोठ्या आल्यामुळे कणगे लुप्त झाले आहेत, तसेच पूर्वीच्या काळातील गावरान मेवा हरवला आहे.

पूर्वी परिसरात वर्षभर पुरेल एवढे धान्य आणि बियाणे सांभाळून ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती वापरल्या जात असत. या भागात, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, गव्हासह अनेक पिके घेतली जातात.पूर्वी ज्वारी, बाजरी, गहू पिकांची काढणी झाल्यानंतर घरी आणून कणग्यांमध्ये साठवले जात होते. मात्र, कालांतराने कणगे लुप्त होत गेले. कणगे प्रामुख्याने बांबूच्या पातळ काड्यांनी विणली जायची. कणगी साधारण सहा ते सात फुटाची असायची. नवी कणगी वापरण्यापूर्वी ती आतून बाहेरून शेणाने सारवूनघेतली जात असे. उन्हात चांगली वाळल्यावर त्यात धान्य भरले जायचे. धान्य भरून झाल्यावर कणगीच्या तोंडावर गवत पसरवून ते शेणाने लिपले जायचे. कणग्यात धान्य अनेक वर्षे टिकत असल्याने याचा वापर केला जात होता. शिवाय धान्याला कीड लागत नसायची, तसेच कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय वर्षभरासाठी धान्य साठवले जात होते. त्याकाळी घरातील कणगी बघून विवाह ठरविला जात असे पूर्वीचे लोक म्हणतात . आता हीच कणगी हद्दपार झाली आहे.
मातीचे अंगण असणाऱ्या घरांनी आता सिमेंट काँक्रीटची जागा घेतली आहे. त्यामुळे नुसती जागा नाही तर ग्रामीण भागातील गावरान मेवाही हरवून गेला आहे.

कणगी म्हणजे काय ? त्याचा शेतकर्‍याला कोणता उपयोग होतो?

कणगी म्हणजे धान्य साठविण्याची एक रचना.टोपली जशी बांबू पासून बनवितात तशीच कणगी देखील. कणगी चा आकार हा रांजना सारखा किंवा तळापासून (गोल )व्यास उंची पर्यन्त वाढता आणि त्या नंतर निमुळता होत जातो.कणगी आतून बाहेरून शेणाने लिपली जाते आणि उन्हात वाळवतात. त्यात खरीप,रब्बी हंगामात धान्य वाळवून भरतात ,थोडी रिकामी ठेवून वरतून पुन्हा शेणाने हवाबंद होईल अश्या प्रकारे लिपतात.
हवा बंद केल्या मुळे त्या मध्ये साठवलेले धान्याला कीड लागत नाही, धान्य कित्येक वर्ष कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता चांगल्या स्थितीत राहते.

मात्र आता कानगी ची जागा आता प्लस्टिक ड्रम,आणि पत्र्याच्या टाक्या नी घेतल्या मुळे
धान्याला लवकर कीड लागते. धान्याला कीड लागू नये म्हणून त्या मध्ये विशिष्ट प्रकारची पावडर टाकली जाते.ते आरोग्या साठी हानिकारक ही असू शकते ?

Views: 494
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टुरिस्ट हॉटेल अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा अड्डा?परिसर ड्रग्स मुक्त करा अन्यथा DCP कार्यालयावर मोर्चा. :- डॉ. राजन माकणीकर

टुरिस्ट हॉटेल अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा अड्डा?परिसर ड्रग्स मुक्त करा अन्यथा DCP कार्यालयावर मोर्चा. :- डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)