• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वाढत्या महागाईमुळे वधुपित्यांची दमछाक….दागिने, कपड्यांसह विविध वस्तूंच्या किंमतीचा आलेख वाढता…

माणगंगा by माणगंगा
March 14, 2024
in महाराष्ट्र
0

वाढत्या महागाईमुळे वधुपित्यांची दमछाक

दागिने, कपड्यांसह विविध वस्तूंच्या किंमतीचा आलेख वाढता…

त-हाडी:- लग्न सोहळा कायम आयुष्यभर लक्षात राहावा, यासाठी मोठा खर्च केला जातो. दुष्काळी स्थितीत, वाढत्या महागाईत लग्नसमारंभात वधुपित्यांची मोठी दमछाक होताना दिसत असल्याचे चित्र आहे. शहर व ग्रामीण भागात सध्या लग्नाची रेलचेल वाढली आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी अनेकदा वडील आयुष्यभराची पुंजी खर्ची करतात. परंतु, वाढती महागाई आणि विवाह सोहळ्यातील लागणाऱ्या दागिने, कपडे, विविध वस्तू, डेकोरेशन, जेवणाचा खर्च या किमतीचा आलेख वाढतच असल्याने वधुपित्याचे मात्र बजेट कोलमडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीत वधूवरांच्या पालकांना विवाह सोहळे उरकावे लागणार आहेत. लग्न हे धूमधडाक्यातच झाले पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे असते. अगदी प्रवेशद्वारापासून ते जेवणाच्या मेन्यूपर्यंतची प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने विचार करून ठरविली जाते. पण, महागाईमुळे पालकांचे कंबरडे मोडू लागले आहे. लग्न सोहळे जोमाने सुरू झालेले आहेत. अनेक पालकांनी पाल्यांचे लग्न धूमधडाक्यात करण्याचा विचार केला होता. परंतु, वाढत्या महागाईमुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडू लागले आहे. सर्वच वस्तू महाग होत आहेत. वधू-वरांचा मेकअप आणि इतरही वस्तूंसाठी खर्च वाढला आहे. बॅण्डबाजा व सजावटीसही वीस ते पंचवीस टक्के दरवाढ झाली तर खाद्यपदार्थ, दूध-पनीर, मिठाई, फुले, पुष्पहार, कपडे, मंगल कार्यालये, हॉल, केटरिंग, डेकोरेशन, बॅण्ड पथक, डीजे, ऑर्केस्ट्रापर्यंत सर्वांचेच भाव वाढले आहेत.

चौकट:- विवाह मुहूर्त मार्च महिन्यात

विवाहासाठी ता. १०, ११ आणि १२ मार्च हे शुभ दिवस सांगितले आहेत.

चौकट:-
वधुपित्याकडून विविध वस्तू

डेझर्ट कुलर, फ्रिज, फॅन, खुर्चा, डायनिंग टेबल, लोखंडी कपाट, एलईडी टीव्ही, कॉट/गादी, सोफासेट, विविध भांडी, आदी अनेक प्रकारच्या वस्तु विवाहात देण्यासाठी धडपड असते. आप-आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार त्या देण्यासाठी वधुपिता प्रयत्न करताना दिसतात.

चौकट:- डेकोरेशनचा खर्च वाढताच

फुलांवर व सजावटीचा सर्वाधिक खर्च दिसून येत आहे. मजुरी शुल्कातही वाढ झाली आहे. विवाह समारंभात उपयोगात येणाऱ्या खुर्चीपासून स्टेज, मंडप आदी भाड्यातही वाढ झाली आहे. गहू, तांदूळ, साखर, तेल आणि डाळींचे दर वाढल्याने लग्नाच्या जेवणावळीचा खर्च वाढला आहे

चौकट:- सोने, कपड्यांची दरवाढ

विवाह सोहळ्यासाठी महत्त्वाचे असलेल्या सोन्याचे दर प्रतितोळा ६० ते ६२ हजारांवर गेले आहेत. मागीलवर्षीच्या तुलनेत दर वाढल्याने दागिन्यांवरही अधिकचा खर्च होत आहे. कपड्यांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामानाने शेतीमालाला भाव नसल्याचे चित्र आहे.

Views: 235
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणला जावा…..बार्शी वकील संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणला जावा.....बार्शी वकील संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)