आटपाडीत टेंभू योजनेचे पाणी कालव्यातून सोडावे …. संभाजीराव देशमुख
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातून ओढापत्रांनी सांगोला भागामध्ये टेंभूचे पाणी जात आहे परंतु आटपाडीतील शेतकऱ्यांची पिके मात्र पाण्याअभावी जळून खाक झाले आहेत तरी आटपाडीतील कालव्याने पाणी जमिनीला सोडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की सध्या भीषण पाणी टंचाईमुळे शेती व जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रशन गंभीर बनला आसुन तात्काळ शेती साठी व जनावरासाठी आटपाडी मधील सर्व कॅनाल व पोट कालव्याना पाणी सोडण्यात यावे.अशी मागणी संभाजी देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे व टेंभू विभागाकडे केली आहे . निवेदनात पुढे म्हटले आहे की हजारो एकर शेती व पशुधन धोक्यात आले आहे. जनावराना पिण्यासाठी पाणी नाही शेतीची पिके जळुन खाक झाली आहेत .
आटपाडी मधील शेतक-यांना एवढ्या पात्रातील पाणी बघुन समाधान मानावे लागत आहे. पण प्रत्याक्षात शेतक-यांच्या जमिनीला पाणी नाही पिके वाळून गेली आहेत जनावरांचा चाऱ्यासाठी धडपड चालू आहे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे स्वतः जगायचं की जनावरे जगवायची असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आटपाडीत शेतक-यांची अवस्था अशी झाली आहे कि “पाणी उशाला कोरड घशाला” त्यामुळे शेतामधील पिके पाण्या आभावी करपु लागली आहेत. आपण जर तात्काळ पाणी नाही सोडले तर शेतक-यांना शेती व पशुधन वाचवता येणार नाही त्यामुळे शेतक-याचे फार मोठे नुकसान होणार आहे. लवकरात लवकर कॅनॉल व पोट कालव्याना पाणी सोडण्यात यावे पाणी सोडावे म्हणजेच शेतीकरी वाचेल, पशुधन वाचेल आणि कॅनॉल शेजारील विहीराला सुधा त्याचा फार मोठा फायदा होईल . त्यामुळे लवकारात लवकर कॅनॉलमध्ये पाणी सोडून पशुधन वाचवावे अशी मागणी टेंभू कार्यालयाकडे सामाजिक कार्यकर्ते संभाजी देशमुख यांनी टेंभू कार्यालय केली आहे.
फोटो.. संभाजी देशमुख