दिघंचीत राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करा अन्यथा उपोषण.. गणेश जुगदर
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया ची शाखा सुरू करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर यांनी दिला आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून दिघंची बाजारपेठेची गणना केली जाते व या बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त उलाढाल होते .तसेच येथे एकही राष्ट्रीयकृत बँक शाखा नाही. तसेच येथे कॉलेज, पेट्रोल पंप व दूध संघ , व विशेष म्हणजे कराड पंढरपूर महामार्गावर हे गाव वसलेले आहे. तसेच शेतकरी वर्ग या बाजारपेठेमध्ये शेतीचे साहित्य कमी दरामध्ये मिळत असल्याने खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असते म्हणून येथील बाजारपेठेला महत्त्व आहे.
दिघंची परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बँकेची सोय नाही दिघंची हे गाव जिल्हा परिषद गट असून या गावाच्या आजूबाजूला 19 गावे वाड्या वस्त्या आहेत . आटपाडी येथे राष्ट्रीयकृत बँक आहेत. आणखी एक नवीन युनियन बँक ऑफ इंडिया ही शाखा आटपाडी येथे होणार आहे. तरी या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आटपाडी ऐवजी दिघंची येथे सुरू करावी . अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे
आटपाडी शहरात पहिल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तसेच खाजगी सहकरी बँका, पतसंस्था आहेत. परंतु दिघंची तालुक्यामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ असून सुद्धा राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी दिघंची च्या जनतेला व आजूबाजूच्या जनतेला 15 किलोमीटर तसेच काही जनतेला 25 किलोमीटर अंतरावरून आटपाडीत यावे लागते. जर ही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आटपाडी ऐवजी दिघंचीत सुरू केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
तसेच ग्रामीण भागातील जनतेला जीवनमान उंचावण्यासाठी व बेरोजगार मुलांना मुद्रा योजनेसारख्या योजनेतून कर्ज पुरवठा मिळू शकतो.
दिघंची येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा होण्यासाठी शेतकरी संघटनेचे आटपाडी खानापूर विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर हे 2 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत .
जोपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेची शाखा दिघंची येथे होणार आहे असे पत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
फोटो..गणेश जुगदर