जि. प. शाळा फत्तेपूर (फॉ ) शाळेत “शाळा पूर्वतयारी मेळावा” संपन्न.
तऱ्हाडी दि. २२(प्रतिनिधी ) शिरपूर तालुक्यातील कोडीद केंद्रातील जि. प. शाळा फत्तेपूर (फॉ )येथील । जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा तयारी अभियानांतर्गत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्येची देवता सरस्वती माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्या हस्ते करून मेळाव्यास सुरुवात झाली. स्टार्स प्रकल्पांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शाळेबद्दल असणारी भीती दूर व्हावी या हेतूने शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन १५ ते २२एप्रिल २०२४ दरम्यान करण्याचे शासन पत्रक अनुषंगाने करण्याचे आदेश होते .
गावातील चारही अंगणवाडी ताईच्या मदतीने नियोजन करण्यात आले होते. गावात दवंडी देऊन शाळा पूर्वतयारी मेळाव्याची जागृती केली. माता पालकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक, भावनिक क्षमतांचा खेळमिळीच्या वातावरणात आढावा घेतला. ‘शाळेतले पहिले पाऊल’ या पुस्तकेतील कृती इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांनी माता पालकांच्या मदतीने करून घेणे, आयडिया व्हिडिओ समजून घेऊन विद्यार्थ्यात शिक्षणाची गोडी निर्माण करणे याबाबत शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भामरे मार्गदर्शन केले .
नियोजनानुसार इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्याचे शालेय आवारात स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवागतांचे गुलाबपुष्प, फुगे देवून स्वागत करण्यात आले. पूर्व तयारी मध्ये विविध पृष्प माळा .’पोस्टर, फुगे लावून शाळा परिसर सजविण्यात आला होता. प्रसन्न वातावरणात दाखल विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर नियोजनाप्रमाणे या मुलांचे विकास पत्र भरुन घेण्यात आले.
विकास पत्रातील शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी या अनुषंगाने विविध साधनांच्या साहाय्याने मुलांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची रूपरेषा मुख्याध्यापक प्रकाश भामरे यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण शिक्षक लुकेश गावीत कृष्णा अहिरे दिलीप पाडवी अंगणवाडी शांता पाडवी ममता पाडवी ग्रामस्थ दाखल पात्र विद्यार्थी यांचे पालक सहभागी झाले होते. कार्यकमाचे सूत्रसंचलन लुकेश गावीत यांनी केले कृष्णा अहिरे यांनी आभार मानले