कोंढावळ, संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘गुरुपौर्णिमा’साजरा कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक जिभाऊ माळी यांनी स्वीकारले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः| गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः || कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी महिमा माळी व प्राजक्ता माळी यांनी केले. तसेच गुरूंना प्रणाम करत गुरुणं विषयीचे मनोगत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या बऱ्याच विद्यार्थ्यानी व्यक्त केले. त्यात निशा माळी, मयुरी माळी, प्राची माळी,भावेश माळी,ऋषिकेश धनगर,जान्हवी माळी,हर्षदा माळी,हितेश माळी,प्रतीक्षा माळी,मोहिनी माळी,पदमिनी माळी,प्राजक्ता माळी एवढ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर प्रमुख वक्ते विद्यालयाचे उपशिक्षक गोरख वाल्हे यांनी आपल्या मनोगतातून आपले ध्येय साध्य करायचे असेल तर अर्जुनासारखा पक्षाच्या डोळ्यावरच एकाग्रता ठेवता आली पाहिजे तरच आपण आपली स्वप्न साकार करू शकतो असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तसेच सांस्कृतिक समितीचे अध्यक्षा मंदाकिनी माळी यांनी आपल्या मनोगतातून गुरुशिष्य परंपरा सांगताना व्यासमुनी यांच्या विषयी सांगताना अध्यात्मिक, संस्कारात्मक विचार मांडले.
अध्यक्ष यांच्या मनोगता नंतर उपशिक्षक प्रमोद परदेशी यांनी मनोगत व्यक्त करून अध्यक्ष व उपस्थित शिक्षक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक धनराज जगताप, रोहिदास खैरनार, योगेश शिंपी,कैलास सैंदाणे,सुलोचना सोनवणे तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल, स्वप्नील बैसाणे यांनी प्रयत्न केले.







