एम.सी.जी ग्रुप च्या वतीने महा- नाईम बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या योजना अनाथ आश्रमास जीवनावश्यक व शैक्षणिक साहित्याची मदत
आज रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मिरज शहरातील अल्पावधीतच नामवंत झालेले एम सी जी ग्रुप यांनी मदत नव्हे….. कर्तव्य अशी भावना ठेवून मिरज शहरातील समता नगर परिसरात असलेले *महा नाईम बहुउद्देशीय सामाजिक संस्था* यांच्या वतीने चालविण्यात येणारे *योजना अनाथ आश्रम* यास भेट दिली.
या अनाथ आश्रम मध्ये असलेले मुलांच्या सोबत सर्वांनी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडी – अडचणी व गरजा या बाबत माहिती घेतली.
तसेच *योजना अनाथ आश्रम* चे संस्थापक यांच्याशी अ
नाथ आश्रम बाबत पूर्ण माहिती घेऊन चर्चा केली. त्याचप्रमाणे एम.सी.जी ग्रुप च्या वतीने योजना अनाथ आश्रम करिता *दोन ते तीन* महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू तसेच शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन एक सामाजिक कर्तव्य म्हणून मदत केली.
अध्यक्ष श्री आरिफ शेख यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे एम सी जी ग्रुप चे कॅप्टन श्री. रियाज मुरसल यांनी याबाबत अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला आहे.
यावेळी एम सी जी ग्रुप मधील सर्व सदस्य खेळाडू उपस्थित होते.







