७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन ,दि१५.८.२०२१ रोजी सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या अंतर्गत वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम महादेव मंदिराच्या पायथ्याशी , येरवडा पुणे या ठिकाणी आयोजित केला होता.कार्यक्रमाला महादेव मंदिर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री बलभीम राजगुरू ,टाटा कम्युनिकेशन कंपनी च्या एच आर ज्योती नितीन जमदाडे श्री चंद्रकांत सावंत .गितांजली रिठे, मनिषा जाधव उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा उज्वला गायकवाड यांनी संस्थेचे कार्य व वृक्षारोपण संवर्धन व महत्व याविषयी माहिती सांगितली.पाव्हुण्यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. आंबा जांभूळ,आवळा,पेरू चिंच, ही झाडे लावण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षा नी लावलेल्या वृक्षांची संवर्धन व काळजी घेणार सांगितले.
प्रजावती गायकवाड यांनी पाव्हुण्यांचे आभार मानले







