• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला !!

माणगंगा by माणगंगा
August 16, 2021
in मुंबई
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला !!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत संसदेत महिला खासदारांना झालेली धक्काबुक्की, कमाल ५०% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचे राज्यांना द्यावयाच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारची भूमिका या प्रमुख विषयांसह देशातील विविध घडामोडींचा परामर्श घेतला. यावेळी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्याक विकास मंत्री ना. नवाब मलिकसाहेब आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने बैठक घेऊन घटनादुरूस्ती करून SEBC ( Socio- Economically Backward Class) ची ओळख पटवणे व तसा दर्जा देणे याचे अधिकार राज्य सरकारांना देण्याबाबत निर्णय घेतला आहे. बहुतांश राज्यांनी कमाल ५०% आरक्षण मर्यादा यापूर्वीच पार केली आहे. या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालातील भौगोलिक कसोटी,सामाजिक कसोटीचे निकष पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे राज्यांना ५०% कमाल आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचे अधिकार देणे ही फसवणूक आहे. केंद्रसरकारने यापूर्वीच राज्यघटनेमध्ये १०३वी घटना दुरूस्ती करून १५(६) व १६(६) ही कलमे दाखल करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी १०% वाढीव आरक्षण दिले आहे व इंद्रा साहनी केस प्रकरणातील ५० टक्के मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे घटनादुरुस्ती हाच एक पर्याय शिल्लक राहतो. केंद्राने घटनादुरुस्ती आणून राज्यघटनेच्या कलम १५(४) व १६(४) मध्ये आवश्यक दुरुस्त्या करून इंद्रा सहानी केस निर्वाळ्याची परिणामक्षमता कमी करून आरक्षण मर्यादा ५०% पेक्षा पुढे न्यावी आणि आरक्षण मर्यादा ५०% पेक्षा अधिक करण्यास राज्य सरकारांना शक्ती प्रदान करावी, अशी भूमिका पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत मांडली.

तसेच राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. सत्ताधारी पक्षाचा नेता माध्यमांसमोर आपली भूमिका मांडेल असे वाटले होते. पण सरकारतर्फे सात मंत्री मीडियासमोर सरकारची बाजू मांडत होते. याचा अर्थ सरकारची बाजू कमकुवत होती, हे स्पष्ट होते. राज्यसभा हे वरिष्ठांचे सभागृह आहे. संबंध देशातील विधिमंडळं संसदीय कामकाजाचे मार्गदर्शन घेण्यासाठी राज्यसभेकडे पाहात असतात. राज्यसभेतच असे प्रकार घडत असतील तर हे दुःखद आहे. मार्शल सभागृहात येतात, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सदनात मार्शल आलेले आपण याआधी पाहिले नसल्याचे पवार साहेब म्हणाले.

पेगासिस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल, पी. चिंदबरम या संसद सदस्यांनी या विषयात बराच अभ्यास केला आहे. तिघांपैकी एकाला समितीत घेतल्यास पारदर्शकता वाढेल, असे मत त्यांनी मांडले. पण हा सर्वस्वी सुप्रीम कोर्टाचा अधिकार असल्याचे पवार साहेबांनी स्पष्ट केले.

Views: 201
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
एक दिवस साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले आदिवासी पारधी समाजाचा कलंक पुषून काढतील असा मला विश्वास आहे ….आमदार .राहुल(दादा )कुल,

एक दिवस साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले आदिवासी पारधी समाजाचा कलंक पुषून काढतील असा मला विश्वास आहे ….आमदार .राहुल(दादा )कुल,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)