शिरपूर तालुक्यात आपर कार्डला नोंदनी अभियानाल सुरुवात
त-हाडी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत वन नेशन… वन स्टुडंट आयडी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी’ (अपार) दिली जाणार आहेत या मोहिमेचे काम धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून वेगाने सुरु असून, नोव्हेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे.
अपार कार्ड ही विद्यार्थ्यांसाठी नवी ओळख देणारी प्रणाली असून त्यामध्ये या विद्यार्थ्यांना बारा अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. संबंधित क्रमांक त्या विद्यार्थ्यांची ओळख असणार आहे. या क्रमांकावर असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक नोंदीचा समावेश असेल. शिक्षण विभागाकडून या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहेत
प्रतिक्रिया
अपार कार्ड हे आधारकार्डशी जोडले जाणार आहे. यामध्ये पालकांच्या आधार क्रमांकाचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हे कार्ड अधिकच उपयुक्त ठरणार असल्याने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची अपार कार्डसाडी नोंदणी केलीआहेत
— राजेंद्र पाटील
मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा त-हाडी
या नव्या कार्डमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी करावी लागणारी धडपड थांबविली जाणार असून, विद्यार्थ्यांची सर्व माहिती एका कार्डच्या क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडून अपार नोंदणीसाठी सातत्याने शाळा, महाविद्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे
गणेश सुरवडकर
गटशिक्षणाधिकारी शिरपूर
अपार कार्ड प्रणाली ही एज्युलॉकरसारखी आहे. त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, त्याची शाळा, महाविद्यालय, इयत्ता, त्याचा निकाल, त्याला मिळालेले पुरस्कार, शिष्यवृत्तीसह अन्य शैक्षणिक बाबींविषयीची एकत्रित माहिती दिसणार असल्याने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेत आहोत
— फोटो सह -रावसाहेब चव्हाण
मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय त-हाडी
फोटो – शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय येथे आपर कार्डला नोंदनी करतांना शिक्षक प्रविण शिंदे व मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण