संपले इलेक्शन जपा रिलेशन.. कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर भावनिक साद
त-हाडी / प्रतिनिधी
शिरपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावात प्रचारावेळी राजकारणामुळे गावकी, भावकी, नातेवाइक व मित्रमंडळी वेगवेगळ्या पक्षांत विभागली गेली होती. परंतु, बुधवार मतदान संपले व शनिवार निकालही लागला त्यामुळे आता ‘संपले इलेक्शन, जपा रिलेशन’
झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन..!’ असे प्रेमाचे संदेश ग्रुपवर फिरू लागल्याने एकमेकांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होऊ लागला आहे त-हाडी येथील सर्वच पक्षांचे तरुण कार्यकर्ते एकमेकांना पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जपत आहेत
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिरपूर मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या आणि अपक्षांच्या समर्थकांना जोर चढला होता. यात त-हाडी गाव सुद्धा मागे राहिले नव्हते मग आपल्या उमेदवाराचे कौतुक करण्यापासून विरोधकांचे वाभाडे काढण्यापर्यंत सगळे प्रकार या काळात झाले. निवडणुकीच्या काळात काही नात्यांमध्ये व मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होतो. कार्यकर्ते एकमेकांपासून दुरावतात.
त्यांचे गटतट पुढील निवडणुकांपर्यंत तसेच राहतात. यात नात्यांचाही विसर पडतो. मात्र, त-हाडी परिसरात निवडणूक संपताच सोशल मीडियावर ‘संपले इलेक्शन, जपा रिलेशन’ अशा पोस्ट व्हायरल होत आहेत.त-हाडी येथील तरुण कार्यकर्ते चहापाणी किंवा काही कारणातून एकत्र आलेल्या मंडळींनी निवडणुका संपल्यावर सर्व काही विसरून गेले पाहिजे, असा संदेश हि त-हाडीकरांनी दिला आहेत
प्रतिक्रिया..
निवडणुकीतील विरोध राजकीय होता व्यक्तिगत नाही कोणाचे मन दुखावले असेल तर माफी असावी. कारण राजकारण निवडणुकांपुरते असते व मैत्री आयुष्यभर साथ देणारी असते. चला, पुन्हा मैत्रीच्या पक्षात प्रवेश करूया,
–प्रफुल पाटील,
माजी ग्रामपंचायत सदस्य त-हाडी
प्रचाराच्या काळात टीकेमुळे आलेला कडवटपणा विसरून सर्वजण एकत्रित आलो. निवडणुका संपल्या आहेत. आता जवळच्यांशी असलेले संबंध जपा, हे सांगण्यासाठी संपले इलेक्शन, जपा रिलेशन’ हा संदेश आम्ही देणार आहोत
— किरण भलकार,
माजी ग्रामपंचायत सदस्य त-हाडी
निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप दिसुन आले मात्र, कुणाला तरी यश-अपयश पचवावेच लागते त्यामुळे प्रचाराच्या काळात दिसलेला टीकेचा सूर, शाब्दिक वॉर आणि कडवटपणा बाजुला ठेऊन पुन्हा गावातील मैत्रीचे संबंध जपूया…….
— किरण भामरे,
सामाजिक कार्यकर्ता त-हाडी
प्रत्येकजण आपल्याला ज्या पक्षाची विचारधारा पटते, त्या पक्षाचे काम निवडणुकीच्या काळात कार्यकर्ता म्हणून करीत असतो आता निवडणूक संपली आहे आम्ही सर्वपक्षीय मित्र निवडणूकीत घडलेल्या घटना विसरून पुन्हा गावच्या विकासासाठी एकत्रित आहोत.
— विशाल करंके, सामाजिक कार्यकर्ते त-हाडी
निवडणुका क्षणिक काळाकरिता असतात नातेसंबंध व मैत्री दीर्घकाळ असते निवडणुकीमुळे गावात कटुता येता कामा नये, आम्ही वेगवेगळ्ळ्या पक्षातील सर्व मित्र एकत्रित येऊन मैत्रीचे नाते सांभाळण्यासाठी पुन्हा प्रयत्न कर….
— डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे,
सामाजिक कार्यकर्ते त-हाडी