आरे दुग्ध वसाहत भ्रष्टाचारी सुरक्षा अधिकारी श्री. विलास पवार यांची वंशावळ संपत्तीची चौकशी होऊन तात्काळ निलंबन व्हावे. विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांची मागणी
मुंबई दि (प्रतिनिधी) आरे वसाहत हे पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक क्षेत्र आहें, मात्र : त्या दृष्टीकोणातून कर्तव्यदक्षता दाखवली जात नसून येथील सुरक्षा अधिकारी श्री. विलास पवार हे आपल्या पदाचा जाणीवपूर्वक दुरुपयोग करून अवैद्य निर्माण करत आहेत त्यामुळे अश्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे तसेच वंशावळ संपत्तीची चौकशी करण्याची मागणी विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहें.
मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्रालयाला पाठवलेल्या तक्रारी व मागणी पत्रात समाजभूषण डॉ. माकणीकर असे म्हनाले की,
या संदर्भात मी आपणास यापूर्वीही इमेलद्वारे तक्रारी पत्रानव्ये माहिती दिलेली आहें. आरे वसाहती मध्ये या अधिकाऱ्यानी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून यंत्रनेद्वारे वरिष्ठान्मार्फतीने तपास केल्यास प्रशासनातील श्री विलास पवार एक फार मोठा चोर सिद्ध होऊ शकेल.
सध्या युनिट क्रमांक 5 येथे काही व्यावसायिक दुकानें थाटली आहेत. प्रामुख्याने बालाजी ज्यूस सेंटर, तंदुरी चहा, A-1 चायनीज फूड झोन, गिरी पान शॉप, Are कॅफे, पाणी पुरी सेन्टर
तसेच हिताची कपंनीचे एटीएम
असे उभारले आहें. असेही ते म्हणाले.
सदरील हॉटेल किंवा व्यावसायिक आस्थापना समोर चक्क जागा अतिक्रमन करण्यात येऊन पत्र्याचे शेड लावून खुर्च्या टेबल अंथरले आहेत. सदरचा अनधिकृत कारभार सुरक्षा अधिकारी श्री. विलास पवार यांच्या कृपादृष्टीने चालू आहें.
गट क्रमांक ८ या ठिकाणी असलेले तबेले धारकाचे मालक श्री. मोहित यांना दिलेल्या बंगल्याच्या बाहेरील जागेच्या आजूबाजूला हिरवे कपड्याची जाळी बांधून त्यामध्ये रॅबिटची भरणी करून मोठ्या प्रमाणात एक मजली घर बांधण्याचे काम अतिशय जलद गतीने चालू आहे यात या अधिकाऱ्याने चांगल्या प्रकारे आपले हाथ पाय धुवून प्रशासकीय सेवेला कालिंबा फासला आहें. असा आरोप पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहें.
तसेच युनिट क्रमांक २ येथे शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या गोदामाच्या आजूबाजूला रॅबिट ची भरणी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात आली आहे.
युनिट क्र.३१ येथे सुध्दा बेकायदेशीर मोकळ्या जागेवर घराचे बांधकाम व माळ्याचे बांधकाम केले गेले आहे. तसेच हे सर्व बेकायदेशीर कामे श्री. विलास पवार याने स्वतःच्या आर्थिक हितासाठी केले आहे.
या व आदी संदर्भातील सक्षम पुरावे डॉ माकणीकर यांच्याकडे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
श्री. विलास पवार यांच्याकडून बेकायदेशीर कामाला मोठ्या प्रमानात चतुराईने प्रोत्साहन देन्यात येत आहे त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबणं होऊन वंशावळ संपत्तीची चौकशी व्हावी. तसेच त्यांच्या भ्रष्ट कारभारातून उभारलेले बांधकामे निष्काशीत करण्यात यावीत आणी अतिक्रमने काढण्यात येऊन संबंधीतावर सुध्दा कायदेधीर कारवाई व दंड थोठावण्यात यावा. अशी मागणी माकणीकर यांनी केली आहें.