जन्म शताब्दी वर्षी ही डॉ, शंकरराव खरात उपेक्षित !
आटपाडी मध्ये खरातांचे स्मारक जन्म शताब्दी वर्षात होणार का ?
आटपाडी ; कुलगुरू, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे सदस्य, रेल्वे, बोर्ड चे सदस्य महाराष्ट्र साहित्य परिषद चे अध्यक्ष, बँक ऑफ इंडिया चे संचालक, महाराष्ट्र राज्य, शिक्षण कमिटी चे अध्यक्ष, यशवंतराव, चव्हाण, सोशल सायन्स अँड रीचर्स इन्स्टिट्यूट मानद सदस्य, अश्या अनेक शासकीय समिती वर काम केलेले आहे असे माणदेशी सुपुत्र, आटपाडी तालुक्यातील,दलित साहित्य आपल्या लेखणी ने समृद्ध करणारे डॉ, शंकरराव खरात यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असून या वर्षात तरी त्यांचे स्मारक होणार का ? हा प्रश्नच आहे !
ताराळ अंतराळ, हे खूपच गाजलेले पुस्तक आहे
तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत, अधिनियम तयार करण्याचे काम डॉ,खरात यांच्या वर सोपविण्यात आले होते, ते त्यांनी यशस्वीपणे पार पाडले ,
सन१९५८ ते १९६१ पर्यंत ‘ प्रबुद्ध भारत’ चे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय होते ! ,
पुणे विद्यापीठ ने डिलीट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता !
डॉ, शंकरराव खरात यांना मिळालेले पुरस्कार कोलकाता येथील भाषा परिषद तर्फ ‘ताराळ अंतराळ’ या पुस्तकाला माजी राष्ट्रपती झेलसिंग यांच्या हस्ते पुरस्कार ,
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मराठी साहित्यकृती पुरस्कार,
कोल्हापूर छत्रपती श्रीमंत शाहू महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले होते,
राष्ट्रपती आर,के, नारायण, यांच्या हस्ते, लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित,
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळा तर्फ,मानपत्र, आणि पारितोषिक,
जागतिक मराठी परिषद तर्फ इस्राएल मध्ये सन्मान ,
या शिवाय महाराष्ट्र तील अनेक संस्था, कडून अनेक सन्मान व पुरस्काराने सन्मानित,
डॉ,शंकरराव खरात यांचे साहित्य,
कादंबऱ्या १०
ललित ५
कथा संग्रह १२
विवेचक ग्रंथ ८
या शिवाय अनेक लेख व साहित्य प्रसिद्ध
ताराळ अंतराळ, हे आत्म चरित्र इंग्लिश मध्ये अनुवाद होणार आहे या मुळे आटपाडी तील सक्सेस स्टोरी जगात जाणार आहे
डॉ, शंकरराव खरात यांचे दि,९ एप्रिल २००१ मध्ये निधन झाले त्यास १९ वर्ष झाली ! त्यांच्या स्मारकासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या प्रत्येक्षात काहीच झाले नाही या साठी महाराष्ट्र मधील साहित्य यांच्या पुणे किंवा आटपाडी येथे बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे राज्य सरकारने स्मारकासाठी सुरू करण्यासाठी निर्णय घेतला जावा
श्री विलासराव खरात
सचिव डॉ, शंकरराव खरात
प्रतिष्ठान आटपाडी
त्यांच्या घरा कडे जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही आटपाडी ग्रामपंचायत ने दिवा बत्ती सुद्धा सोय केली नाही !
आटपाडी चे आमदार श्री राजेन्द्र (आण्णा ) देशमुख, माजी जिल्हा परिषद सांगली अध्यक्ष श्री अमरसिंह (बापु) देशमुख, व सांगली जिल्हा परिषद चे सदस्य अरुण बालते यांनी मागील आठवड्यात घरा ला भेट देऊन पाहणी केली व प्रतिमेचे पूजन केले रस्ता व घरा जवळील काटे झुडपे काढण्यात प्रशासन व ग्रामपंचायत सदस्य यांना सांगितले आहे







