शहरात रासायनिक फवारणी करण्यात यावी..
एम. आय.एम पक्षाची मागणी..
पुसद
पुसद शहरात व तालुक्यात बुखार,खोकला ताप व इतर अनेक रुग्ण व्हायरस इन्फेक्शन होत आहे. या करिता मागील एक महिन्या पासून डेंगू ची साथ चालू आहे खूप सारे नागरीक डेंगू व मलेरिया ने ग्रस्त आहेत
तरी सुद्धा नगर पालीके मार्फत कुठल्या ही प्रकार च्या उपाय योजना ,फवारणी, फॉगिंग मशीन चा उपयोग झालेला दिसत नाही आहे शहरातील सर्व वार्डात लवकरात लवकर रासायनिक फवारणी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्वरित रासायनिक फवारणी करण्याची मागणी एम आय एम पक्षाच्यावतीने पुसद नगर परिषद मुख्याधिकारी डॉ.किरण सुकळवाड यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी तालुका व शहर निरीक्षक सैय्यद इम्तियाज , अमजद खान शहराध्यक्ष, सैय्यद सिद्दीकोद्दिन तालुकाध्यक्ष, डॉ. मो. जुबेर कार्याध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष फिरोज खान, युवक शहराध्यक्ष मोहसिन खान ,तालुका व शहर प्रवक्ता मिर्झा आदिल बेग , शेख अतिक , मिर्झा आवेस कार्याध्यक्ष, शेख आजीज, सुल्तान खान, डॉ.अन्सार शेख महासचिव,अमन खान, मोहम्मद जिब्रान शहर सचिव , रहेमान चव्हाण तालुका युवक महासचिव व सोशल मीडिया प्रभारी, राज खान युवक महासचिव व अन्य मजलिस कार्यकर्ता उपस्थित होते…







