• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

खर सांगा, शेत पिकाचा बाप किंवा मालक कोण आहे ?

माणगंगा by माणगंगा
September 24, 2021
in महाराष्ट्र
0
खर सांगा, शेत पिकाचा बाप किंवा मालक कोण आहे ?

खर सांगा, शेत पिकाचा बाप किंवा मालक कोण आहे?

        आम्ही शेतकरी राब राबतो कष्टाने शेती पिकवतो पण त्याचे बाप किंवा मालक खरच आम्ही आहोत का? असा प्रश्न नियमित आम्हा भारतीय शेतकऱ्यांना पडलेला असतो. यावर बरेच मत मतांतर व वाद विवाद झालेले आहेत. माझ्याही मते आम्ही फक्त पालक आहोत बाप, मालक किंवा धनी नाहीत. कारण आम्ही बियाणे लागवड पासून ते काढणी मोडणी पर्यंत पालकाचे काम करतो आणि बाजारात आणतो. इथपर्यंतच सर्व आम्ही बाप, मालक या आविर्भावात असतो. पण खर वास्तव काय आहे ते आपण यावर सविस्तर पाहू.

         आम्ही शेतकरी पेरणी पूर्वी मशागत करून पेरणीयुक्त शेत तयार करतो आणि नंतर बियाणे खरेदी करतो त्यासोबत लागणारे खत घेतो व पेरणी करतो. पेरणी करण्यासाठी लागणारे बैल बारदाना/ ट्रॅक्टर स्वतःचे किंवा भाड्याचे असते. यासाठी लागणारा खर्च उसनवारी करून किंवा कर्ज काढून करतो.  म्हणून आम्हाला रात्र रात्र झोप नसते .कारण कोणाकडून उधार घेतलेले किंवा कर्ज काढलेले असते याचीच चिंता असते. या सर्वांचा मेळ घालून वेळेत पेरणी करणे हेच डोक्यात असते. म्हणून या ८ ते पंधरा दिवसांच्या काळात आमच्या घरात चीड चीड, राग तणाव असतो. काहीजण तर हा मेळ घालने आपल्याच्याने शक्य नाही म्हणून देवाघरी निघून जातात. कसतरी मेळ अवमेळात आम्ही पेरणी करतो. 

          पुढे जाऊन सर्वकाही निसर्गाच्या हातात असते. पाऊस चांगला झालेला असेल किंवा ओल चांगली असेल तर उगवून येईल नाहीतर गेलं सगळकाही मातीत. बरं उगवून आल त्याची मशागत म्हणजे कोळपन/डूबन, खुरपणी, औषध फवारणी हे करावच लागणार. आम्ही मुलांना जेवढं जपत नाहीत त्यापेक्षा जास्त पिकाचे पालन पोषण यावर लक्ष देतो. बरं या काळातही आमच्या हातात काहीच नसते या पिकाचा खरा मायबाप निसर्ग असतो तो कोपला की, होत्याचे नव्हते करून टाकतो. कधी दुष्काळ, तर कीड पैदास करून किंवा अतिृष्टी करून सर्व पिक मारून टाकतो. आम्ही रडतो खूप वाईट झालं मी याला मुलापेक्षा जास्त जपल होत, आता माझ काही खर नाही. त्यातही आमच्यातील काहीजणांना विरह सहन होत नाही म्हणून उरलेले औषध किंवा जनावराची दोरी घेवून आत्महत्या करतात. काहीवेळेस चांगलं पिक येतं आणि मग त्याची काढनी/खुडणी, मळणी/कांडून कुटून व स्वच्छ आणि प्रतवारी करून बाजारात आणतो.

         बाजारात घेवून येण्या अगोदर त्याचा बाप सरकार त्याची किमान आधारभूत किंमत ठरवून देतो. ती असते आम्ही  पालनपोषण केलेल्या खर्चा एवढी किंवा त्यापेक्षा किंचित जास्त. त्यामध्ये आमचे श्रम सुध्दा निघत नाहीत. 

         बाजारात आणखी एक बाप समोर उभा राहतो तो व्यापारी आणि साधा पालन पोषनाचा खर्च सुध्दा न देता घेवून जातो. मग आमच्या डोक्यात विचार चक्र सुरू होते एवढ्या दिवस मेहनत केली, रोगराईतून बाहेर काढले, ऊनवारा, पाऊस पाण्यात जपलं एवढा मोठा खर्च केला, मुलांना कपडे घेतले नाहीत, फीसाठी पैसे दिले नाहीत, वह्या पुस्तकं घेतले नाहीत, बायकोला साडी घेतली नाही आणि उसनवारी, उधारी व कर्जकाढून कोणाची भरती केली. आता उधारी उसनवारी द्यायची कशी, कर्ज तर फिटत नाही, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न आणि कुटुंब चालवायचे कसे? अशा अनेक प्रश्नांनी डोकं सुन्न होत. परत आमच्यातील काहीजन पिकाचे उरलेले औषध किंवा जनावराची दोरी घेवून जीवन संपवतात.

खरचं मित्रांनो सांगा शेत पिकाचा बाप किंवा मालक शेतकरी आहे का?

शेतकरी
संजय ज्ञानोबा शिंदे
मु. पोष्ट नेकनूर, ता. जि. बीड
मो. ९८५०५२३९६९

Views: 185
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध.मानपाडा पोलीस ठाण्यात कडक कारवाई करण्यास दिले निवेदन.

डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध.मानपाडा पोलीस ठाण्यात कडक कारवाई करण्यास दिले निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)