करगणीत आ.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ
करगणी ता.आटपाडी मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते जयवंत सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, भाजपा तालुकाध्यक्ष उमाजी सरगर मान्यवर उपस्थित होते.
त्यामध्ये करगणी येथील राम मंदिर समोरील खुल्या जागेत प्लेविन ब्लॉक बसविणे 5 लाख, जि प शाळा नंबर 1 दुरुस्ती करणे 4 लाख,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे हायमास्ट पोल बसवणे 1लाख 21 हजार, रामनगर ढोर वस्ती येथे हायमास्ट पोल बसवणे 2लाख, ढोर वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 2लाख , होलार समाज गल्ली येथे रस्ता व गटर काँक्रिटीकरण करणे 14 लाख ,मातंग समाज गल्ली येथे रस्ता व गटर कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, मातंग समाज गल्लीत हाय मास्ट पोल बसवणे 5 लाख, नवबौद्ध समाज गल्ली येथे आरसीसी गटर करणे 4 लाख, नव बौद्ध समाज गल्ली ते शेटफळ रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 8 लाख, व सौचालयाचे युनिट बसवणे 2लाख 21 हजार रुपये असा भरघोस निधी करगणी परिसरांमध्ये दिला
भूमिपूजन वेळीं अशोक पाटील, भगवान सरगर, बाळासाहेब सरगर, दादा मंडले, नाथा सरगर,पिंटू सरगर, निमेश कोळेकर, निलेश कांबळे, दादा मांडले,अमोल सरगर, अनिल सुर्यवंशी, शेखर रणदिवे, भारत पाटील तसेच मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.






