जिजाऊ जन्मस्थळाच्या राष्ट्रीय स्मारकासाठी लोकसभेत मागणी करणार: खा. सुप्रियाताई सुळे
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभाग या दोघांनी लक्ष घातले पाहिजे,” अशी भुमिका खा.सुप्रियाताई सुळे यांनी मांडली. सुप्रियाताई सुळे मातृतीर्थ सिंदखेड राजा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन पाहणी केल्यानंतर ताईंनी आपले म्हणणे मांडले.
या दौऱ्यात खा. सुप्रियाताई सुळे यांनी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव, रामेश्वर मंदिर, रंगमहाल काळा कोट, सावकार वाडा ,राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधव समाधी, निळकंठेश्वर मंदिर, पुतळा बारव, चांदणी तलाव यांना भेट देत ताईंनी तेथील माहिती जाणून घेतली. जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी,ॲड. संदीप मेहेत्रे व विजय तायडे यांनी त्यांना या ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगितली. ऐतिहासिक स्थळांच्या पाहणीनंतर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी या ऐतिहासिक स्थळांच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी ताईंनी सखोल चर्चा केली.
ताईच्या या दौऱ्यामुळे ऐतिहासिक स्थळाच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे दिसते. बैठकीत बोलताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेसाहेब म्हणाले की, सिंदखेड राजा मध्ये असलेल्या ऐतिहासिक व सुंदर अशा वास्तू आहेत. यांच्या देखीरेखीचे काम केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या माध्यमातून सुरू आहे.परंतु कोरोनाच्या कालखंडात कामे थांबली होती. खा.सुप्रियाताई सुळे यांनी ऐतिहासिक सर्व वास्तूंची पाहणी केल्यानंतर या वास्तूंच्या रखडलेल्या कामांना सुरुवात होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ऐतिहासिक वास्तूचे महत्व नष्ट होऊ नये या दृष्टीने काम पुर्ण करण्याच्या सुचनाही ताईंनी दिल्या.







