आटपाडी — दिघंची येथे मनसे पक्षाची स्थापना
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे शहर मनसे शाखेचा उद्घाटन सोहळा हलगी ताशा व जयघोषात संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती मनसे नेते दिलीपबापू धोत्रे सहकार सेना प्रदेश अध्यक्ष व सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत(फायटरसाहेब) यांची उपस्थितीहोती.
शंकर मोरे-पाटील यांच्या संयोजनात शाखा अध्यक्ष पदी सोमनाथ मोरे उपाध्यक्ष रोहीत(भैया)सावत ,शाखा सचिव- अमोल पुजारी व खजिनदार- निखिल कांबळे यांनाशाखेचा कार्यभार सोपवण्यात आला.
यावेळीं मनसे विद्यार्थी सेनेचें जिल्हा अध्यक्ष – वैभव कुलकर्णी, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष अंकुश पाटील ,जिल्हा सचिव राजेश जाधव , उपजिल्हा अध्यक्ष सत्यवान पिंजारी,तालुका अध्यक्ष संजय पाटील, ता.उपाध्यक्ष शरद ढोकळे, सांगोला विधानसभा अध्यक्ष अक्षय विभूते, आर टी सरगर ,आटपाडी महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ.मनीषा खांडेकर ,ता.उपाध्यक्ष महिला सौ. अरुणा यादव , वाहतूक सेनेचे ता अध्यक्ष मारुती(दाजी)खिलारी ,शेतकरी सेनेचे ता अध्यक्ष प्रकाश गायकवाड ,विभाग अध्यक्ष अजित खंदारे ,जयवंत मगर ,गौरीहर बाड, पियुष ढगे, रोहन यादव, महाराष्ट्र सैनिक बबलू बाड, शंतनू शेंडे आदी उपस्थित होते.







