• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

चळवळीच्या मुशीतला लोकशिक्षक -कॉ.नामदेव करगणे …..लेखक-कॉ.मारुती शिरतोडे

माणगंगा by माणगंगा
October 7, 2021
in सांगली
0
चळवळीच्या मुशीतला लोकशिक्षक -कॉ.नामदेव करगणे …..लेखक-कॉ.मारुती शिरतोडे

चळवळीच्या मुशीतला लोकशिक्षक -कॉ.नामदेव करगणे

लेखक-कॉ.मारुती शिरतोडे

शिक्षक म्हटलं की सर्वसाधारणपणे आपलं कुटुंब, आपली शाळा ,घरची कामं, शेतातली कामं व शाळेची कामं करता करता नाकीनऊ आलेला माणूस असं चित्र डोळ्यापुढं उभं राहतं. याला जे अपवाद आढळतात त्यातीलही आदर्श शिक्षक होण्यासाठी,आपल्याला पुरस्कार मिळेल या आशेवर शिक्षण क्षेत्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने धडपडताना आपल्याला दिसून येतात.

त्यांचे धडपडणेचे कार्य उत्तमच असते यात वादच नाही परंतु घर,शाळा व समाज यांची योग्यरितीने सांगड घालून ” शिक्षक हा समाज प्रबोधनाचा पाईक असला पाहिजे” हे ध्यानात घेऊन समाजप्रबोधनाच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलेले आढळतात.अशापैकीच एक केवळ शिक्षक न राहता लोक शिक्षकाची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडणारा आदर्श शिक्षक आम्ही पाहिलाय.तो शिक्षक म्हणजेच आमचे गुरुवर्य कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगावचे कॉम्रेड नामदेव करगणे सर ….


तसा करगणे सरांचा आणि माझा पहिला परिचय मी इयत्ता आठवी मध्ये असताना झाला. कारण कुंडलच्या प्रतिनिधी हायस्कूल मध्ये मी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा तेथे असणाऱ्या अनेक शिक्षकांतून उठून दिसणारे भारदस्त व्यक्तिमत्वाचे शिक्षक होते करगणे सर. मी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत कुंडलच्या क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंग मध्ये राहून प्रतिनिधी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे.

या तीन वर्षाच्या कालखंडात कुंडल मध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या,ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या,ज्या ज्या कार्यक्रमांना हजेरी लावत आली,सहभागी होता आले त्या सर्वच घडामोडीतून आम्हाला समाज परिवर्तनाच्या चळवळीच वेडं लागलं.क्रांतीअग्रणी जी.डी. बापू, कॅप्टन आकाराम पवार, राम लाड, कॅप्टन भाऊ सारखी माणसं कायम क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंग मध्ये यायची,चर्चा करत बसायची, बोर्डिंग मध्ये विविध व्याख्याने व्हायची, कार्यक्रम व्हायचे आणि या सगळ्या कार्यक्रमात,चर्चेत मी अनेक वेळा दोन शिक्षकांना पाहायचो त्यामध्ये भाई व्ही.वाय.(आबा) पाटील व कॉ.नामदेव करगणे सर त्यात असायचे.

त्यातूनच आमची ओळख अधिक घट्ट होत गेली.मी विद्यार्थी संघटनेचे काम करू लागलो.ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेच्या कामासाठी शाहीन शेख, श्रीकांत कांबळे ,रियाज अट्टेवाले, सतीश लोखंडे ,विलास साठे ,शांतिनाथ मांगले ,कैलास पवार ,किशोर भोरे,राजू जमादार,प्रकाश जाधव अशी आम्ही तरुण मुलं विद्यार्थी प्रश्नावरील अनेक आंदोलनात सक्रिय राहू लागलो. तेव्हा करगणे सरांची अन आमची जास्तच ओळख झाली.अन विद्यार्थी चळवळीपासून सरांनी अखेरचा श्वास घेईपर्यंत सरांचे मार्गदर्शन, सरांच्या गाठीभेटी ,विविध कार्यक्रमातून आमचा एकत्रित सहभाग कायमस्वरूपी होत राहिला. करगणे सर म्हणजे समाज चळवळीचे वेडं मनात भरलेला,अंधश्रद्धा,रूढी ,परंपरा यांना साफ नाकारणारा आणि रोख-ठोक बोलणारा खराखुरा लोकशिक्षक होता असेच म्हणावे लागेल.

करगणे सरांनी शिक्षकी पेशाची नोकरी करता करता आपल्या एकत्र कुटुंबाला जसं प्रगतीपथावर नेण्यासाठी जिवाचं रान केलं तसचं क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे जनलढे होत राहिले त्यात सुद्धा सर अग्रभागीच राहिले. आम्ही जेव्हा सरांचे भाषण ऐकायचो तेव्हा मोठ्या आवाजात परखडपणे बोलणारा,त्यातून आपला मुद्दा श्रोत्यांना पटवून देणारा,आपल्या बुद्धीला पटेल तेच बोलणारा आणि तेच करणारा हा लोकशिक्षक एक विलक्षण नेताच वाटायचां.

मी करगणे सरांना भेटल्यानंतर नेहमीच सर मला प्रथम विचारायचे की,”काय मारुती, आई वडील कसे आहेत,बरे आहेत का?मुलांचे काय चाललेय?” अशी अगदी आपुलकीने चौकशी करणारे करगणे सर अनेक बैठकातूंन, अनेक मेळाव्यातून ,अनेक सभेतून आणि मोर्चातून आम्हाला भेटत राहिले,अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र वावरलोय, बोललोय, चर्चा केलीय त्यामुळे सर आपल्यातून निघून गेलेत असे वाटतच नाही.अलीकडील काही वर्षात तर सेवानिवृत्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांनी खूप वाहून घेतले होते. बामसेफ सारखी जनसंघटना असेल, वंचित बहुजन आघाडी सारखा नवीन पक्ष असेल,विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल अथवा महामार्ग संघर्ष समिती असेल अशा अनेक समाज परिवर्तनाच्या संघटनेतून सतत काम करणारा,आपली भूमिका योग्य रीतीने मांडणारा, संघटना वाढीसाठी तन,मन,धन वापरून प्रयत्न करणारा खरा लोकशिक्षक म्हणजे करगणे सर.

सरांनी महामार्ग संघर्ष समितीच्या माध्यमातून कवठेमंकाळ परिसरातील शेतकऱ्यांची जी मोठी आंदोलनं केली ती आंदोलनं म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारी प्रकाशबेटे म्हणावी लागतील. महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी अशी जी मोठी आंदोलने सांगली जिल्ह्यात झाली त्यात डॉ.अमोल पवार,कॉ.दिगंबर कांबळे,कॉ.नामदेव करगणे यांनी केलेल्या आंदोलनातून जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या

.”दिसेलअन्याय जेथे पेटून उठू आम्ही”ही वृत्ती मनात ठेवून चळवळीत काम करणारा धडाडीचा लोकशिक्षक म्हणजे नामदेव करगणे सर होते.गतवर्षी सर आजारी पडलेचे निमीत्त झाले. आणि काही दिवसातच सर आपल्यातून निघून गेले.त्यानंतर त्यांच्या पत्नी ही काही महिन्यापूर्वी आपल्यातून निघून गेल्या. करगणे दांपत्य म्हणजे एक सुंदर विचारांची खाण होती

. अशा या सुंदर विचारांच्या खाणीने अनेकांना घडवलं, अनेकांना चांगल्या मार्गाला लावलं, अनेकांना जनतेच्या लढ्यात सक्रिय केलं ,कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात या दाम्पत्यांनं आपला खारीचा वाटा उचलला. अशा या चळवळीच्या मुशीतील शिक्षक दाम्पत्याचा वारसा कार्यकर्ते तर घेतीलच पण त्यांची मुलेही पुढे चालवतील अशी आशा करुया. सरांच्या प्रथम स्मृतिदिनी डाव्या,पुरोगामी चळवळीच्या वतीने मी सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करुन क्रांतिकारी लाल सलाम करतो.

कॉ. मारुती बळवंत शिरतोडे
वाझर, ता.खानापूर जि. सांगली

Views: 779
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
देशातील तमाम धम्मप्रेमींनी तालुक्यात व जिल्ह्यात निवेदने द्यावेत. (धम्मध्वज सरकारी कचेरीत फडकावन्यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक चे आवाहन)

देशातील तमाम धम्मप्रेमींनी तालुक्यात व जिल्ह्यात निवेदने द्यावेत. (धम्मध्वज सरकारी कचेरीत फडकावन्यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक चे आवाहन)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)